Udyan Ganesh Mandir : शिवाजीपार्क मैदानातील प्रसिद्ध उद्यान गणेश मंदिराला BMC ची नोटीस

Udyan Ganesh Mandir : दादर येथील प्रसिद्ध उद्यान गणेश मंदिराला मुंबई महानगर पालिकेने नोटीस दिली आहे. शिवाजी पार्क मैदानतील उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली.

Udyan Ganesh Mandir : शिवाजीपार्क मैदानातील प्रसिद्ध उद्यान गणेश मंदिराला BMC ची नोटीस
Udyan Ganesh Mandir
| Updated on: Sep 19, 2026 | 10:24 AM

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : दादर येथील प्रसिद्ध उद्यान गणेश मंदिराला मुंबई महानगर पालिकेने नोटीस दिली आहे. अनधिकृत शेड हटविण्याचे पालिकेचे निर्देश दिले आहेत. अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून लवकरच हातोडा पडणार आहे. दादर शिवाजीपार्क मैदानातील उद्यान गणेश मंदीरात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या उद्यान गणेश मंदिराच्या आवारात बांबूचे शेड बांधून अनधिकृत बांधकाम केल्याने महापालिका जी उत्तर वॉर्डने उद्यान गणेश मंदिराच्या ट्रस्टला नोटीस बजावली आहे. शिवाजी पार्क मैदानतील उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली. या मंदिरातील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे १९६६ मध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी छोटी गणपतीची मूर्ती सापडली होती. मूर्ती उद्यानात सापडल्याने मंदिराला उद्यान गणेश मंदिर असे नाव देण्यात आले. पालिकेने मंदिर ट्रस्टला वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

मंदिराला लागूनच अनधिकृत शेड उभारण्यात आली आहे. ही शेड हटवण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार केली होती. सात दिवसांच्या आत शेड हटवली नाही, तर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आलेला. उद्यान गणेश मंदिर प्रसिद्धआहे.

तितकीच श्रद्धा, आस्था भाविकांच्या मनात

नवीन बाइक, कार खेरदीनंतर पूजेसाठी म्हणून भाविक या मंदिरात घेऊन येतात. दर मंगळवारी, गणेश चतुर्थी, अंगारकी, गुढी पाडवा, नववर्षाला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. दादर शिवाजी पार्क भाग हा सगळ्या मुंबईत प्रसिद्ध आहे. मंदिराबद्दल तितकीच श्रद्धा, आस्था भाविकांच्या मनात आहे. अशावेळी मंदिराला नोटीस येणं हे धक्कादायक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us