Mumbai Accident: वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! पोलीस हवालदाराचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव गाडीने पोलीस हवालदराला उडवले आहे. या हवालदाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mumbai Accident: वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! पोलीस हवालदाराचा मृत्यू
Worli Sea link
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 09, 2025 | 2:19 PM

मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉइंडजवळ झाला आहे. रस्त्यावरील भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने पोलीस हवालदाराला उडवले. या हवालदाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच महिला पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाली आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉइंटजवळ काही व्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामधील पोलीस हवालदार दत्तात्रय कुंभार यांना भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने उडवले. ते वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यानंतर त्यांना वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महिला पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाली आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.