AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मी फाशी घेईल असं मनोज जरांगे पाटील आम्हाला म्हणाले, त्यामुळेच आम्ही.., अमोल खुणेचा हादरवणारा दावा, मोठी खळबळ

मनोज जरांगे यांचा घातपात प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने खळबजनक दावा केला आहे. तसेच त्याने यावेळी जालना पोलीस अधीक्षकाची भेट घेत मोठी मागणी देखील केली आहे.

तर मी फाशी घेईल असं मनोज जरांगे पाटील आम्हाला म्हणाले, त्यामुळेच आम्ही.., अमोल खुणेचा हादरवणारा दावा, मोठी खळबळ
अमोल खुणेचा गंभीर आरोप Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 5:00 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल खुणे याने खळबळजनक दावा केला आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे, तसेच तो मनोज जरांगे पाटील घातपाताचा प्रयत्न प्रकरणतील संशयित आरोपी देखील आहे, नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे, दरम्यान जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आणि माझी एसआयटी चौकशी आणि नार्को टेस्ट करावी, अशा मागणीचं निवेदन त्याने यावेळी पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातलं मला सगळं माहिती आहे, योग्य वेळी सर्व काही बाहेर काढणार असा इशाराही यावेळी खुणेने दिला आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खुणेनं मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुम्ही जर कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईल, असं मनोज जरांगे पाटील आम्हाला बोलले होते, त्यामुळेच आम्ही कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं असा आरोप यावेळी खुणे याने केला आहे.  कोपर्डी प्रकरणात मी शिक्षा भोगलेली आहे, मनोज जरांगे यांनी शिक्ष भोगली नाही, असंही यावेळी खुणे याने म्हटलं आहे. दरम्यान खुणे याने केलेल्या या आरोपामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

गुन्हा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगायला तयार, नाही सिद्ध झाला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी खुणे याने मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. दरम्यान जालना पोलीस अधीक्षकांच्या भेटीवर बोलताना खुणे म्हणाला की, माझी मागणी एवढीच आहे की जे माझ्यावर आरोप लागले आहेत, मनोज जरांगे पाटील जे बोलत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर माझं इतकंच म्हणणं आहे, की आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी, शिवाय जेवढ्या चौकश्या शक्य असतील तेवढ्या सर्व चौकश्या या प्रकरणात लावण्यात याव्यात.  ईडी, सीबीआय, नार्को टेस्ट अशा सर्व चौकश्या कराव्यात असंही यावेळी खुणे याने म्हटलं आहे.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?