AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तान पुढच्या 24 तासात घेणार यूटर्न? भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तान सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला. पाकिस्तान संघ भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

IND vs PAK : पाकिस्तान पुढच्या 24 तासात घेणार यूटर्न? भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता
IND vs PAK : पाकिस्तान पुढच्या 24 तासात घेणार यूटर्न? भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यताImage Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 4:26 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफचं विधान समोर आलं आहे. त्याने सांगितलं की, पाकिस्तान भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय मागे घेऊ शकते. राशिद लतीफने भारतीय प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, पाकिस्तानला निर्णय बदलण्याची सवय आहे. राशिद लतीफने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते.

पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या बहाण्याने राजकीय पोळी भाजत आहे. मोहसिन नकवीच्या निर्णयाची पाकिस्तानात स्तुती होत आहे. राशिद लतीफने सांगितलं की, ‘पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते. आमच्या येथे तसंच होतं. यात काही अडचण नाही. आशा आहे की पडद्यामागून काही चर्चा होत असण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान सरकार कदाचित एकमेकांशी बोलत असावेत. असं आम्हाला दिसत नाही पण तसंच होतं. पुढच्या 24 तासात काहीही होऊ शकते.’ राशिद लतिफच्या वक्तव्यानंतर पु्न्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पडणार असं दिसत आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक अशी स्थिती तयार करत असल्याचं बोललं जात आहे.

पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना खेळला नाही तर त्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकते. स्पर्धेतील दोन गुण असेच जातील. त्याचबरोबर कोट्यवधींचं नुकसान होईल ते वेगळं.. पाकिस्तानला आयसीसी स्पर्धांमधून पैसे मिळतात. त्यामुळे बहिष्कार टाकला तर आयसीसीकडून मिळणारी वार्षिक रक्कमही मिळणार नाही. इतकंच काय तर द्विपक्षीय मालिकेतून सस्पेंड केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची पूर्ण वाताहत होईल. 2028 मध्ये टी20 वर्ल्डकपचं यजमानपदही मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच जगभरातील क्रिकेट बोर्ड पीएसएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना एनओसी देखील देणार नाहीत.

जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट
रोहित पवारांनी घेतली मृत को-पायलट शांभवी पाठक यांच्या कुटुंबाची भेट.
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर
मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसमचा बहर.
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल.