Tv9 स्पेशल रिपोर्ट | ‘राऊत, फाऊद, दाऊद सारखे…’, फडणवीस राऊतांवर नेमके का तुटून पडले? पाहा Video

फडणवीसांनी बाजार बुणगे म्हटलं आणि राऊतांची सकाळची पत्रकार परिषद याच टीकेवरुन सुरु झाली. मुंबईतल्या चारकोपमधली सावरकर गौरव यात्रेतून फडणवीस राऊतांवर तुटून पडले.

Tv9 स्पेशल रिपोर्ट |  राऊत, फाऊद, दाऊद सारखे..., फडणवीस राऊतांवर नेमके का तुटून पडले? पाहा Video
| Updated on: Apr 04, 2023 | 11:06 PM

मुंबई : बातमी फडणवीस आणि राऊतांमधल्या शाब्दिक चकमकीची…बाजार बुणगे, पंतप्रधान मोदींवरही टीका करतात, असं फडणवीस म्हणाले.  बाजार बुणगे शब्दावरुन राऊतांनी पुढचा शाब्दिक सामना सुरु केला. फडणवीसांनी बाजार बुणगे म्हटलं आणि राऊतांची सकाळची पत्रकार परिषद याच टीकेवरुन सुरु झाली. मुंबईतल्या चारकोपमधली सावरकर गौरव यात्रेतून फडणवीस राऊतांवर तुटून पडले. राऊत, फाऊद, दाऊद सारखे बाजार बुणगे मोदींवर बोलतात अशी टीका फडणवीसांनी केली.

फडणवीसांनी बाजार बुणगे म्हटल्यानंतर, राऊतांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. हिंमत असेल तर ठाण्यात महिलेला मारहाण करणाऱ्या बाजार बुणग्यांना आवरा, असं राऊत म्हणालेत. संजय राऊत भ्रष्टाचाराची प्रकरण मांडून मोदींवर टीका करतायत. मोदींवरच्या टीकेवरुनच फडणवीसांनी चारकोपच्या सभेतून राऊतांवर निशाणा साधला, त्यानंतर पुन्हा राऊतांनी यादीच वाचली.