कुणाच्याही बापाच्या बापाचा बापाचा बापाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही; देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले

महायुतीची मुंबईतील शेवटची प्रचार सभा शिवतीर्थ येथे झाली. महायुतीने या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अदानी यांच्या विरोधात केलेल्या प्रेझेटेन्शनला उत्तर दिले.

कुणाच्याही बापाच्या बापाचा बापाचा बापाचा बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही; देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले
devendra fadnavis
| Updated on: Jan 12, 2026 | 11:11 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या शिवतीर्थ येथील सभेला महायुतीने जोरदार उत्तर दिले. या सभेत राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी माणसाच्या नव्हे तर स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईत झालेल्या या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या अदानीकरणाच्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की मुंबईच्या प्रचाराचा शुभारंभ मी आणि शिंदेसाहेबांनी तीन तारखेला केला. तो दिवस तिथी प्रमाणे आई जिजाऊंचा जन्म दिवस होता. आज शिवतीर्थावर शेवटची सभा घेत आहोत, आजही आई जिजाऊंची जयंती आहे. पुन्हा एकदा महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगात नेला. कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे.पण माझ्यासाठी तो संवाद असतो.काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावं लागतो.मी त्यांच्याच शब्दात सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडीओ…असे म्हणत त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकाचे जुने व्हिडीओ सादर केले.

मराठी माणूस अडचणीत दिसतोय…

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, त्यामुळे आता मला सांगा. आपण उत्तर देण्याची गरज आहे का. उत्तर त्यांनीच दिलं. काल जी सभा झाली त्यात तेच अपील. तीच कारण, तेच मुद्दे. खरं म्हणजे एकनाथ शिंदेंनी सांगितलं ही मुंबई ही कुणाच्या बापाच्या बापच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकणार नाही. मराठी माणूस अडचणीत दिसतोय, खतरे में दिसतोय, तर ३० वर्ष तुम्ही कंचे खेळत होता का असाही सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की  २५ ते ३० वर्ष सत्ता राबवली. खुर्च्या उबवल्या. तरीही मराठी माणसाची ही अवस्था असेल तर चुल्लूभर पाणी में डुब मरो. आदित्य ठाकरेंनी उद्या दिवस भर कधीही सांगावं या आमच्याकडून शीतल गंभीर येतील. करूया चर्चा. काय सांगतात. ही शेवटची निडवणूक. मुंबईकरांसाठी शेवटची निवडणूक नाही. मराठी माणसाची शेवटची निवडणूक नाही. आम्ही पानीपतमध्ये लढणारे आहोत. आम्ही शौर्य गाजवणारी माणसं आहोत. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही. तुमचं अस्तित्व पणाला लागलं आहे असेही  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काकांना किमान चांगली नक्कल करता येते

फडणवीस म्हणाले की  तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही जनता आहे. मराठी म्हणजे ही जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे ही जनता आहे. आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला आवडतं. मला प्रॉब्लेम नाही. त्यांना समजायला पाहिजे. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली. काकांना किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येते. तुमची काय अवस्था होईल ते पाहा असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.