ठाकरे बंधू मामा किंवा बहिणीच्या लग्नाला एकत्र आलेले नाहीत, तर… भाजपच्या बड्या महिला नेत्याचा जोरदार हल्लाबोल
राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकांवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांचे जे काही थोडे नगरसेवक येथील त्यांनी योग्य सुचना दिल्या तर महापालिकेचे काम एकत्र विश्वासात घेऊन करु असाही सल्ला या महिला नेत्याने दिला आहे.

गेल्या ३५ वर्षात वसई-विरार महानगर पालिका एकाच कुटुंबाकडे अडकली होती. जणू येथे कलम ३७० लागले होते. मात्र आता येथे भाजपा-शिवसेना महायुतीची हवा आहे. वसई-विरार महानगर पालिका विजयाचा आणि महापौरचा पहिला पेढा आम्ही मुख्यमंत्र्यांना भरवू असे असे भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी म्हटले आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढत आहोत. वसई- विरार महापालिकेच्या विकासामध्ये हितेंद्र ठाकुर यांची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. येथे हवा भाजपची आहे. ‘शिट्टी’ वाजवायलाही कोणाच्या तोडांत हवा शिल्लक राहिली नाहीए असा हल्लाबोल महाजन यांनी केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे जनतेने बहुजन विकास आघाडीला नाकारले, त्यामुळे तिथे त्यांची हवा राहिलेली नाही. ठाकुर यांना गल्ली गल्लीत हात जोडून मत मागवे लागताहेत.स्थानिकांचा विकास हाच आमचा इथे निवडणुकीतला मुद्दा आहे असेही भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी म्हटले आहे.
भाजपा नेत्या पूनम महाजन यांनी सांगितले की, मुंबईतील माझ्या लोकसभा मतदार संघातल्या जागांचा आढावा घेत असते. अजूनही माझा मतदार संघांत संपर्क-संवाद कायम आहे. माझे वार्ड A प्लस कायम आहेत. केवळ एका पदात गुंतून जाणारा भाजप कार्यकर्ता नसतो.अविरत काम करणे हाच आमच्या पक्षाचा मंत्र असल्याचे महाजन यांनी सांगितले.
ते स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र
ठाकरे बंधूना मनापासून शुभेच्छाआहेत. पण ठाकरे बंधु मामाच्या किंवा बहीणीच्या लग्नाला एकत्र आले नाहिएत. ते स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेत. लोकशाहीत जेव्हा कोणी स्वतःच्या किंवा परिवाराच्या अस्तित्वासाठी लढतो, तेव्हा तो लोकशाहीसाठी लढत नाही तर तो स्वतः साठी लढतोय हे समोर दिसते असेही पूनम महाजन यांनी म्हटले आहे. प्रमोदजींना कोणीही कधीही विसरू शकत नाही. प्रमोदजींची छाप कोणी पुसू शकत नाही. देशात संघटन या विषयावर बोलायला गेले तर प्रमोदजी आवर्जुन आठवतात. भाजप आपला इतिहास कधीही विसरू शकत नाही असेही पूनम महाजन यांनी यावेळी सांगितले.
मुंबईचा भूमिपुत्र फक्त वडापाव विकण्यापुरता नाहीए
मराठी भाषेचा सन्मान काय असतो हे ठाकरे बंधुनी कधी दाखवले नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने केले. मराठी माणूस, भूमिपुत्र मुंबई बाहेर का फेकला गेला ? याचं उत्तर ठाकरे बंधुंकडे आहे का ? ठाकरे बंधूंचं या विषयावर फक्त ‘कव्हरिंग फायर’ सुरु आहे. त्याने काही साध्य होणार नाही असेही पूनम महाजन यांनी सांगितले. मुंबईचा भूमिपुत्र फक्त वडापाव विकण्यापुरता नाहीए हे भाजप सांगतंय. तो उद्याचा आयटी इंजिनीअर, पायलट असेल. हे भाजप सांगतेय. MMR रिजन मध्ये विकास होतोय, त्यात नोकरी भूमिपुत्राला मिळणार असेही त्या म्हणाल्या.
अण्णामलाई यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ
अण्णामलाई यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. त्यांना मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणायचे होते. ते जागतिक पातळीचे शहर म्हणायचे होते. त्यांच्या शब्दाचा खेळ केला गेला. त्यांच्या विधानाचा राजकिय अर्थ घेऊ नका. विषय भरकटवू नका असेही पूनम महाजन यांनी सांगितले. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. मराठी भूमिपुत्र हिंदू असेल. तो किंवा ती असेल.पण मराठी हिंदू भूमिपुत्र असेल असे त्यांनी सांगितले.
अपेक्षित कामगिरी होणार नाही
ठाकरे कुटुंबांशी अजूनही स्नेह कायम आहे. कितीही राजकिय मतभेद असले तरी भारतीय, मराठी संस्कृती आम्ही विसरत नाही. त्यांना शुभेच्छा आहेत. पण राजकिय लढाई असते तेव्हा रोड मॅप आणि विकासाचे मुद्दे फक्त महाजन आणि भाजप म्हणून पुढे घेऊन जाऊ. निवडणुकीत ठाकरे बंधु यांना अपेक्षित असलेली कामगिरी होणार नाहीए. जेव्हा महायुतीचा महापौर असेल तेव्हा, त्यांचे थोडे नगरसेवक असतील त्यांना मुंबईच्या विकासासाठी सोबत घेऊन काम करू असेही त्या म्हणाल्या.
