AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा… राज ठाकरे यांचा अण्णामलाईंवर जोरदार हल्लाबोल

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबई महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात जोरदार सभा झाली. राज ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी ही शेवटची संधी असल्याचे म्हटले.

अरे भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा... राज ठाकरे यांचा अण्णामलाईंवर जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray
| Updated on: Jan 11, 2026 | 11:55 PM
Share

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज शिवतीर्थावर तोफ धडालली. राज ठाकरे यांनी मुंबईतील जागा कशा प्रकारे उद्योगपतींच्या घशात घातल्या जात असल्याचा व्हिडीओ दाखवला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की मुंबईसाठी पूर्वीपासून षडयंत्र रचले जात आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आज कळेल पुढे काय वाढून ठेवले आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी अनेक दाखले देत जोरदार भाषण केले.

राज ठाकरे म्हणाले की मराठी म्हणून मराठी माणसांनी एकत्र येऊच नये असे षडयंत्र आहे. तुम्हाला मुंबईतच घरे नाकारली जात आहेत. काल परवा ती तामिळनाडूतून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय ? भ*व्या तुझा काय संबंध इथे यायचा असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला. याच्यासाठीच बाळासाहेब म्हणाले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. मुंबईत अनेक लोक राहत आहेत. जैन, मारवाडी राहत आहेत. कबुतरांच्या नावाने भडकवलं जात आहे. कबुतरं राहिली बाजूला हे लोक फडफडत आहेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

एक निलेशचंद्र जैनमुनी आहेत, ते म्हणतात, कबुतर खाणे, मांसाहारी खाने याच्यातील वाद मिटवण्याची जबाबदारी फडणवीसांनी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली होती. पण त्यांनी वाद मिटवला नाही. तर वाद भडकवला असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगत पुढे सांगितले की तुम्हाला भडकवण्याचं काम सुरू येथे आहे. मात्र आम्ही एकटे आहोत तरीही सर्वांसाठी आम्ही काफी आहोत. आमच्या वादात जाऊ नका असा इशारा राज यांनी यावेळी दिला.

तर हे जमीन विकत घेऊ शकत नाहीत

गुजरातमधून गुजरातमधून बिहारी हाकलले, त्याच्या बातम्या कधी होत नाही. या बिहारींना हाकलणाऱ्याला तर भाजपने तिकीट दिलं. इथे मात्र तुमच्या आमच्यात वाद करीत आहेत. तुमचं अस्तित्व नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू आहे. राज ठाकरे यावेळी म्हणाले की मुंबई का पाहिजे हातात ?. केंद्रात आणि राज्यात यांची सत्ता आहे. मात्र मुंबई आणि एमएमआर रिजनच्या जमीनींसाठीउद्या महापालिकेची परवानगी लागेल म्हणून हे करीत आहेत. पालिका आपल्या ताब्यात असतील तर हे जमीन विकत घेऊ शकत नाहीत. अदानीला जमीन देऊ शकत नाही असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.