शाळा, रुग्णालयं अन् धार्मिक स्थळं; धारावीकरांना मिळणारी नवी घरं नेमकी कशी? क्षेत्रफळ आणि सुविधा जाणून घ्या

धारावीचा पुनर्विकासाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता तिथली नवी घरं कशी असणार हेही समोर आलं आहे. धारावीकर आता एक नवी कोरी धारावी अनुभवणार असून यावर मुख्यमंत्र्यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

शाळा, रुग्णालयं अन् धार्मिक स्थळं; धारावीकरांना मिळणारी नवी घरं नेमकी कशी? क्षेत्रफळ आणि सुविधा जाणून घ्या
dharavi redevelopment project 350 square foot houses
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 4:55 PM

गेल्या अनेक दिवसांपासून धारावी पुनर्विकास सातत्याने चर्चेत असतो. धारावीची नवी रचना राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यासाठी तब्बल ६३ हजार कोटींचा हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ आणि समोर आलेल्या नमुना फ्लॅट्सच्यानुसार नवी धारावी कशी असेल, याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धारावीत नागरिकांना मिळणारे नवे घर नेमके कसे असणार याची झलक अनुभवायला मिळत आहे.

दरम्यान, धारावीत केवळ रहिवाशांनाच नव्हे तर येथील उद्योगांना आणि व्यवसायांनाही कायमस्वरुपीची जागा दिली जात आहे. त्यांना नव्या जागेमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्याचाही लेआऊट समोर आला असून, कोणाच्याही उपजिवीकेचे नुकसान होऊ नये असे सरकारचे उद्दिष्ट आहे. धारावी केवळ झोपडपट्टी नसून ती लघू उद्योगांची आणि अनेक कारागिरांचे केंद्रही मानले गेले आहे. त्यामुळे पुनर्विकासामध्ये याबाबींकडेही लक्ष देण्यात आले आहे.

Loading...

धारावीतील नवी घरं कशी असणार?

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याद्वारे पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची आधुनिक आणि मोफत पक्की घरे दिली जाणार आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि अदानी समूहाची कंपनी यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांचे घर पूर्णपणे मोफत मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नियमांनुसार २५० चौरस फुटांपर्यंत जागा दिली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

आजचं धारावी कसं आहे. तिथं लोक कशी राहतात. हे महत्त्वाचं आहेच. पण धारावी एक आर्थिक इंजिन आहे. तिथे वेगवेगळे उद्योग होतात. खाद्य, लेदर, प्लॅस्टिक रिससर्क्यूलेशन, अशा सगळ्या उद्योगांचे अर्थचक्र तिथे चालतं. त्यामुळे बदलत्या धारावीमध्ये ही सगळी उद्योगं चांगल्या जागेमध्ये कशी कामं करणार आहेत. तिथल्या लोकांना तिथं कसं राहायला मिळणार याकडे आमचं लक्ष आहे, चांगल्या शाळा, चांगले रुग्णालये, चांगली धार्मिक स्थळं, ओपन स्पेस अशा सगळ्या गोष्टी नव्या लेआऊटमध्ये संकल्पित करण्यात आलं आहे. असं सीएम फडणवीसांनी सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us