AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला वाहन चालकांना रोखण्याचा पुरुष ट्रॅफीक पोलिसांना अधिकार आहे का ?

महिला वाहन चालक असेल तर त्याची चौकशी करण्याचा पुरुष ट्रॅफीक पोलिसांना अधिकार आहे का ? कायदा नेमका काय म्हणत आहे.

महिला वाहन चालकांना रोखण्याचा पुरुष ट्रॅफीक पोलिसांना अधिकार आहे का ?
breath analyzer test
| Updated on: Feb 23, 2026 | 8:06 PM
Share

अलिकडे सोशल मीडियावर एका ट्रॅफीक पोलिस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यात बाईकवर महिला रायडर पाहून ट्रॅफीक पोलिसांनी त्याला न तपासता सोडून दिल्याचे दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर आता चर्चा सुरु आहे की पुरुष पोलिस कर्मचारी महिला चालकांना रोखू शकतात की नाहीत ? यावर अनेक जण महिला चालकाला पुरुष पोलिस कर्मचारी रोखू शकत नाहीत असे म्हणत आहेत. तसेच काही लोक म्हणत आहेत की पुरुष कर्मचारी महिला चालकाची ब्रेथ एनालाझर टेस्ट देखील घेऊ शकत नाहीत. मात्र सत्य नेमके काय चला पाहूयात…

नियमात काय म्हटले आहे?

भारतीय वाहतूक नियम पुरुष कर्मचाऱ्यांना कागदपत्राची तपासणी वा नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन चालवणाऱ्या महिला जरी असल्या तरी त्यांना रोखण्याचा संपूर्ण अधिकार पुरुष पोलिसांना आहे. सर्व राज्याचे पोलिसांसाठीचे नियम पुरुष आणि महिलांना एकच आहेत. सुर्यास्तानंतर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती अनिवार्य आहेत. मात्र हा नियम केवळ अटक वा ताब्यात घेण्याच्या संदर्भात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य दैनंदिन तपासणीत हे नियम लागू नाहीत. त्यामुळे रात्रीचे देखील पुरुष पोलिस कर्मचारी महिला चालकाची चौकशी करु शकतात.

थोडक्यात कोणत्याही वाहनाला रोखणे, कागदपत्रांची मागणी करणे , वा दंड लगावणे याचा वाहन चालक स्री वा पुरुष असण्याशी काही संबंध नसून दोघांनाही सारखेच नियम लागू आहेत. रात्रीच्या वेळी अनेक राज्यात सुरक्षा आणि जनतेची सुविधेसाठी जेवढे शक्य असेल तेथे महिला अधिकाऱ्या तैनात करणे पसंद केले जाते. ही एक प्रथा असून कायदा नाही. पुरुष पोलिस अधिकाऱ्यांना आता रात्री अंधारात महिला चालकांना रोखण्यावर कोणतेही प्रतिबंध नाही.

पुरुष आणि महिलांमध्ये भेद नाही

साल २०१५ मध्ये नवी मुंबई पोलिसांनी गोल्फ क्लब रोडवर बेपर्वाईने कार चालवण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला चालकांच्या विरोधात कठोर मोहिम राबविली होती. महिला कॉन्स्टेबलांची संख्या कमी असल्याने पुरुष अधिकाऱ्यांनी दंड आकारण्यात आला. कायदा पुरुष आणि महिलांमध्ये कोणताही भेद करत नाही.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली