AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी…राज्यभरात भीम जयंतीचा जल्लोष, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीत दाखल झाले आहेत. राज्यभरात भीम जयंतीचा उत्साह दिसून येत आहे. आज विविध उपक्रम राबवून भीमसैनिक महामानवाला अभिवादन करत आहेत.

मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी...राज्यभरात भीम जयंतीचा जल्लोष, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 11:36 AM
Share

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2026: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा उत्साह ओसांडून वाहत आहे. चैत्यभूमी, दीक्षा भूमीवर अनुयायांची अलोट गर्दी झाली आहे. पुस्तक वाचनापासून ते रक्तदान आणि विविध अनोख्या उपक्रमांनी भीमसैनिक अभिवादन करत आहे. अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी पुस्तकं खरेदी करण्यासाठी आणि विचारांची लढाई मजबूत ठेवण्यासाठी अनोखे उपक्रम राबविल्या जात आहेत.

बाबासाहेबांनी अर्थकारणाला दिली नवीन दिशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्र्यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अर्थकारणाला दिशा दिली असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या पुढाकारामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर सोन्याला केंद्राधारित ठेवत अर्थव्यवस्थेचा गाडा हाकण्याचे त्यांचे विचार अमेरिकेपासून इतर सर्वच राष्ट्र अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले.

चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आहे. बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत आहेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेने छायाचित्रांचे प्रदर्शन लावले आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवी मधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेने छायाचित्र प्रदर्शन भरवलं आहे.

कल्याणात अनोखा अभिवादनाचा नजराणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहनावर संसद भवन उभारण्यात आलं. निळ्या रोषणाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सलाम करत भव्य प्रतिमेने लक्ष वेधलं. कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार करण्यात आली. ४४८ कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली. ही कलाकृती समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत असून कलमांनी रेखाटलेल्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाळूशिल्प

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला आरवली सोनसुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चीपकर यांनी सुंदर असे वाळू शिल्प बनविले आहे. हे वाळू शिल्प बनविण्यासाठी त्यांना तीन तास लागले या बनविलेल्या वाळू शिल्प मुळे त्यांचे फार मोठे कौतुक होत आहे.

नागपुरात मध्यरात्री भीम जयंतीचा उत्साह आणि जल्लोष

बाराचा ठोका पडताच आसमंत ‘जय भीम’च्या जय घोषाने निनादला. नागपूरच्या संविधान चौक, इंदोरा चौक,त्रिशरण चौकसह ठिकठिकाणी हजारो भीमसैनिक एकवटले. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात भीम जयंती मध्यरात्री साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी दीक्षाभूमीच्या या पावन नगरीत उत्साहाचा महापूर आल्याचे चित्र आहेय

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर सकाळपासून भीम अनुयायी यायला सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिक्षाभूमीसह शहरात विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून भीम अनुयायी आणि राजकीय पुढारी दाखल झाले आहेत. देशभरातून आलेल्या अनुयायांनी “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.

आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. पुतळ्याचा परिसर विद्युत रोषणाईमुळे खुलून गेला. त्याचबरोबर समाज बांधवांकडून अभिवादनाच्या आणि शुभेच्छा बॅनर लावल्याने हा परिसर खुलून दिसत आहे.

पुण्यात प्रज्ञासूर्याला अनोखी मानवंदना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी झाली. भीम अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. ज्ञान, समता आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे.

‘समता ज्योत रॅली’ची एकच चर्चा

बीडच्या माजलगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज ‘समता ज्योत रॅली’ संपन्न झाली. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा जागर करण्याचा उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राजकीय नेत्यांसह सामाजिक क्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी या समता ज्योत रॅलीलीमध्ये सहभागी झाले होते.

तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला बोलण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य मिळाले. आजपर्यंत ही आणि इथून पुढेही या घटनेला वाईट नजरेने बघणार नाही. हे स्वातंत्र्य लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणत त्यांनी समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देखील दिल्या.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासमोर सेल्फी पॉईंट

सोलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल झाले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो अनुयायींनी हा परिसर फुलून गेला. यंदाच्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासमोर सेल्फी पॉईंट लावण्यात आली आहे. झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देणारी सेल्फी पॉईंटसोबत अनेकजण फोटो काढताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतेदेखील अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत.

सांगलीत मोठ्या दिमाखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळयाचं लोकार्पण

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पार पडत आहे,जयंतीच्या पूर्व संध्येला सांगलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नूतन पुतळ्याचं लोकार्पण रात्री पार पडले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आबेडकर याच्या शुभ हस्ते आणि उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांच्यासह हजारो आंबेडकर अनुयायींच्या उपस्थितीमध्ये मोठया दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य 14 फुटी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातल्या एसटी स्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 फुटी पुतळा नव्याने उभारण्यात आला आहे,जयंतीच्या पूर्वसंध्येला या नव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जल्लोषात व जयघोषात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत लोकपर्ण संपन्न झाले.

पेनावर साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिकृती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम राबवत अनोखी आदरांजली अर्पण केली आहे. कलाशिक्षक गौरव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी चक्क एका पेनावर बाबासाहेबांची अत्यंत सूक्ष्म, जिवंत आणि बोलकी प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ एका तासात ॲक्रॅलिक रंगांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेली ही कलाकृती विद्यार्थ्यांच्या कौशल्याची साक्ष देणारी ठरली आहे. मागील वर्षी भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र रेखाटून चर्चेत आलेल्या गौरव माळी यांच्या प्रेरणेने यंदा विद्यार्थ्यांनी पेनासारख्या छोट्या माध्यमावर हे आव्हान स्वीकारले. या अनोख्या कलाकृतीमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि बाबासाहेबांप्रती असलेल्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाडमध्ये विद्यूत रोषणाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा जल्लोष दिसला. महाड चवदार तळे व क्रांती स्तंभ विद्युत रोषणाईने बहरले. महाड तालुक्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येत दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी ऐक्याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत,,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

135 स्क्वेअर फुट लाइटिंग स्केच

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नाहाटा कॉलेज समोरील प्रांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने 135 स्क्वेअर फुट लाइटिंग स्केच साकारण्यात आले. या लाइटिंग स्केच च्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. या भव्य लाइटिंग स्केचचे विहंगमदृश्य ड्रोन कॅमेराच्या साह्याने कैद करण्यात आले आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ...

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ..

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात...

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज मोठा फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य.

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज मोठा फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं.

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली