AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Bangar: त्या मंत्र्यांना घरी पाठवा, संतोष बांगर यांचा पक्षालाच घरचा आहेर, खासदार श्रीकांत शिंदेसमोरच कडाडले बांगर

Santosh Bangar Warns Minister: ऑपरेशन टायगरच्या चर्चांना विराम मिळताच शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. शिंदे सेनेचे आक्रमक नेते संतोष बांगर यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. त्यांनी काही मंत्र्यांना थेट घरी पाठवण्याची मागणी करत घरचा आहेर दिला आहे.

Santosh Bangar: त्या मंत्र्यांना घरी पाठवा, संतोष बांगर यांचा पक्षालाच घरचा आहेर, खासदार श्रीकांत शिंदेसमोरच कडाडले बांगर
संतोष बांगर, एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 10:44 AM
Share

Santosh Bangar Warns Minister: ऑपरेशन टायगरची चर्चा मागे सरते ना सरते तोच शिवसेनेतील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे. शिंदे सेनेतील काही नेते मंत्र्यांवर फारच नाराज असल्याचे समोर आले आहे. संतोष बांगर हे शिंदे सेनेत दाखल झाल्यापासून त्यांनी काही मुद्यांवर आक्रमक पवित्रा दाखवला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या आक्रमक शैलीने आणि बेताल वक्तव्याने मागील वर्ष गाजले होते. हे दोन्ही नेते राष्ट्रीय स्तरावर गाजले होते. आता संतोष बांगर यांनी राज्य सरकारलाचा धारेवर धरले आहे. त्यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.

मराठवाड्यात धुसफूस

नांदेड येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आढावा बैठक होती. ही बैठक अनेक कारणांनी गाजली. सध्या मराठवाड्यातील काही ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून येते. धाराशिवमध्ये शिवसेनेतील उभी दुफळी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. तर इतर जिल्ह्यातीलही नेत्यांमधील विसंवाद आणि कार्यकर्त्यांची नाराजी उघड झाली आहे. जाहिररीत्या ही नाराजी समोर येत आहे. यावर पक्षाने वेळीच काही धोरण ठरवले नाही तर अंतर्गत विसंवाद वाढून दुफळीने पक्षाला फटका बसण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सत्तेत असूनही निधी वाटपातील अन्याय, अनेक ठिकाणी कामं न मिळण्याची तक्रार, तर कामे करण्यासाठी वारंवार तगादा लावावा लागत असल्याची ओरड कार्यकर्ते करत आहेत.

संतोष बांगर कडाडले

नांदेड येथील शिंदे सेनेच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना पक्ष श्रेष्ठींसमोर आणली. त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यांच्या या आक्रमकपणामुळे काही काळ बैठकीचं वातावरण तापलं. गंभीर झालं. कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मनातील खदखद त्यांनी बाहेर काढली. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना अगोदर घरी बसवा असा घरचा आहेर आमदार संतोष बांगर यांनी दिला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...