Corona new symptoms | कोरोनाची तीन नवी लक्षणे, पाठदुखीचाही समावेश : डॉ. जलील पारकर

| Updated on: Jul 01, 2020 | 1:43 PM

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि ज्यांनी स्वत: कोरोनावर मात केली आहे, त्या डॉक्टर जलील पारकर यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांचं निरीक्षण नोंदवलं आहे.

Corona new symptoms | कोरोनाची तीन नवी लक्षणे, पाठदुखीचाही समावेश : डॉ. जलील पारकर
Follow us on

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि ज्यांनी स्वत: कोरोनावर मात केली आहे, त्या डॉक्टर जलील पारकर यांनी कोरोनाच्या नव्या लक्षणांचं निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोनाच्या नव्या लक्षणात पाठदुखी, उलटी आणि अतिसार या लक्षणाचाही समावेश झाला आहे. ही लक्षणे असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित असू शकते, असं डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितलं. याशिवाय कोरोनामध्ये प्रामुख्याने घसा दुखणं, पाठ दुखणं, अंग दुखणे ही महत्त्वाची लक्षणे दिसतात, असंही डॉक्टर जलील पारकर म्हणाले. (Dr Jaleel Parkar adds new corona symptoms)

मुंबईतील ख्यातनाम डॉक्टर अशी जलील पारकर यांची ओळख आहे. डॉक्टर पारकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे डॉक्टर म्हणून परिचित आहेत.

पल्मॉनॉलॉजिस्ट डॉ. जलील पारकर हे कोरोना रुग्णांवर उपचार करताना, त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय त्यांच्या पत्नीलाही संसर्ग झाला. डॉ. जलील पारकर हे पाच दिवस आयसीयूमध्ये होते. त्यांनी कोरोनावर मात केली.

डॉ. पारकर यांना कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही नवी लक्षणे आढळली आहेत. यामध्ये पाठदुखी, उलटी आणि अतिसार यांचा समावेश आहे. घसा दुखणं, पाठ दुखणं, अंग दुखणे ही लक्षणे यापूर्वीच आढळलेली आहेत.

अमेरिकेच्या संस्थेने नोंदवलेली तीन लक्षणे

आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कोरडा खोकला, थकवा येणं ही कोरोनाची लक्षणे मानली जात होती. मात्र, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या वैद्यकीय संस्थेने कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे सांगितली होती. यामध्ये सतत नाक गळणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे आणि अतिसार यांचा समावेश होता.

आतापर्यंत दिसलेली कोरोनाची लक्षणे 

1. ताप किंवा थंडी वाजणे
2. खोकला
3. श्वास घेण्यास त्रास होणे
4. थकवा येणं
5. स्नायंमध्ये दुखणे
6. डोकेदुखी
7. चव न कळणे किंवा वास न येणे
8. घशात त्रास होणे किंवा घसा खवखवणे
9. सतत नाक वाहणं
10. मळमळ किंवा अस्वस्थ वाटणं
11. अतिसार किंवा जुलाब
12. पाठदुखी
13. उलटी

(Dr Jaleel Parkar adds new corona symptoms)

संबंधित बातम्या 

Corona new symptoms | तुमचंही नाक गळतंय? अस्वस्थ वाटतंय?, कोरोनाची आणखी तीन नवी लक्षणे   

महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री