AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ

मुंबईची तुंबई कशी होते हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली आहे. घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे.

मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ
MUMBAI RAIN AND CAR
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 4:16 PM
Share

मुंबई : मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्ते, नाले तुंबल्याचे समोर आले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली होती. या सर्व कारणांमुळेच मुंबई आर्थिक राजधानी असली तरी राहण्यासाठी खूपच धोकादायक असे शहर आहे, असे अनेकजण म्हणतात. त्याचीच प्रचिती मुंबईकरांना पुन्हा एकदा आली आहे. थोडाजरी पाऊस झाला की मुंबईची तुंबई कशी होते हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली असून  घाटकोपर परिसरातील ही घटना आहे. (due to heavy rain parked car sunk in ditch at Ghatkopar Mumbai)

घरासमोर पार्क केलेली गाडी खड्ड्यात पडली 

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आहे. येथे एका घरासमोर कार पार्क केलेली दिसतेय. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात बरेच पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे घाटकोपरचा हा भाग भुसभुशीत झाला आहे. कारच्या समोर असलेल्या जमिनीवर खड्डा पडल्यामुळे या खड्ड्यामध्येही चक्क पाणी जमा झाले आहे. याच खड्ड्यात एक कार पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काही सेंकदात कार गायब

कारसमोरचा खड्डा हा जास्त खोल नसावा असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते. मात्र, कार जशीजशी या खड्ड्यात जाते; तसेतसे हा खड्डा किती धोकादायक आणि खोल असावा हे आपल्याला समजते. कार खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती अवघ्या काही सेकंदामध्ये गायब झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, घरासमोरच्या खड्ड्यामध्ये कार पडून गायब झाल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहून मुंबई हे राहण्यासाठी सुरक्षित शहर आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

इतर बातम्या :

Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

Rain Live Updates | वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू

(due to heavy rain parked car sunk in ditch at Ghatkopar Mumbai)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!