AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीची धाड, आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन कारवाई

शहरातील सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपवर ईडीने धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या बाबतीत ईडीने ही कारवाई केली आहे. (ED financial irregularities Omkar Group)

सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीची धाड, आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन कारवाई
ज्यांच्या सहीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या त्या कैलाश गायकवाड यांची ईडीकडून चौकशी
| Updated on: Jan 25, 2021 | 1:57 PM
Share

मुंबई : शहरातील सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. (ED has taken action in respect of financial irregularities and loans taken from banks by Omkar Group)

मागील काही दिवसांपासून ईडीने अनेक नेते, विकासकांच्या घरावार, कार्यालयावर धाडसत्र सुरु केले आहे. धाडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार तसेच इतर अनियमितता यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकाम क्षेत्रीतील सुप्रसिद्ध कंपनी ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार ग्रुपने काही बँकेकडून कर्ज घेतलेल आहे. या कर्जामध्ये तसेच अन्य काही व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने या ग्रुपच्या विविध ठिकाणांवरील कार्यालयांवर छापा टाकला आहे. ईडीने आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट, नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग या जागेवर धाड टाकली आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने जेपी ईन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयावरुद्धा कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार जेपी ईन्फ्रास्ट्रक्टर या बांधकाम क्षेत्रातील कंपनीत उत्तर प्रदेशमधील एका बड्या नेत्याने पैसे गुंतवलेले आहेत. ईडीबरोबरच या कंपनीवर आयकर विभागानेसुद्धा कारवाई केली होती. याच प्रकरणात आता ओंकार बिल्डरवर ईडी मार्फत कारवाई सुरु आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या मोहुण्याला ईडीकडून अटक

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्यानंतर ईडीने ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला 23 जानेवारीला अटक केलं. सोबत मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक केलं होतं. मेहूल ठाकूर यांना अटक केल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या :

ED नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत, आता पुन्हा ईडी नोटीस पाठवण्याच्या तयारीत

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं धाडसत्र, 5 ठिकाणी धाडी

(ED has taken action in respect of financial irregularities and loans taken from banks by Omkar Group)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...