आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्यानंतर ईडीने ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला अटक केली आहे. (ED Arrests Viva Group MD Mehul Thakur And Director M G Chaturvedi In PMC Fraud Case)

भीमराव गवळी

|

Jan 23, 2021 | 10:21 AM

विरार: पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्यानंतर ईडीने ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला अटक केली आहे. सोबत मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक केली असून या दोघांनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. मेहूल ठाकूर यांना अटक केल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (ED Arrests Viva Group MD Mehul Thakur And Director M G Chaturvedi In PMC Fraud Case)

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी काल शुक्रवारी ईडीने हितेंद्र ठाकूर यांच्या नातेवाईकांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्या होत्या. या कारवाईनंतर ईडीने मेहूल ठाकूर आणि मदन गोपाल चतुर्वेदी या दोघांना काल संध्याकाळी 6 वाजता ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. या ठिकाणी दोघांची सुमारे चार ते पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही मध्यरात्री अटक करण्यात आली. आज सकाळी या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. मेहूल ठाकूर हा विवा ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर मदन हा डायरेक्टर आहे. ईडीने काल वसई-विरारमध्ये पाच ठिकाणी धाडी मारल्या होत्या.

आता मी मोठा झालो

दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या परिवाराच्या मालकीच्या विवा ग्रुपवर काल धाडी मारण्यात आल्या होत्या. त्यावर त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. ईडीची जी काही चौकशी असेल त्याला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीच्या तपासात जे काही निष्पन्न होईल त्याबाबत आम्ही आमचा व्यवहार दाखवायला तयार आहोत. कारण सर्व व्यवहार धनादेशाने झाले आहेत.” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले होते. माझ्या कंपनीची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने आता मीही मोठा झालो आहे, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला होता.

हितेंद्र ठाकूरांचा संबंध नाही

विवा ग्रुपमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर हे दोघेही नाहीत. त्यांचे चुलत भाऊ दीपक ठाकूर आणि आणि इतर परिवार विवा ग्रुपचं काम पाहतात. (ED Arrests Viva Group MD Mehul Thakur And Director M G Chaturvedi In PMC Fraud Case)

संबंधित बातम्या:

ईडी चौकशीमुळे आता मी देखील मोठा झालोय : आमदार हितेंद्र ठाकूर

मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

बहुजन विकास आघाडीला धक्का, क्षितिज ठाकूरांच्या खंद्या समर्थकाचा अलविदा, नवा पक्ष ठरला?

हितेंद्र ठाकूरांचा मोठा निर्णय, अख्ख्या वसई-विरारला घरपोच अन्न पुरवणार, साडे तीन लाख कुटुंबांना मोफत शिधा

(ED Arrests Viva Group MD Mehul Thakur And Director M G Chaturvedi In PMC Fraud Case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें