मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

नुकतंच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजला 5 लाखांचे वीज बिल मिळाले (Hitendra Thakur Viva College get 5 lakh electricity bill) आहे.

मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका, आमदार हितेंद्र ठाकूर संतापले

विरार : राज्यभरात वीज बिलाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीररित्या वाढीव वीजबिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. नुकतंच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजला 5 लाखांचे वीज बिल मिळाले आहे. ही रक्कम पाहून हितेंद्र ठाकूर संतप्त झाले. “मी लाईट बिल भरणार नाही, तुम्ही भरु नका?” असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. (MLA Hitendra Thakur Viva College get 5 lakh electricity bill)

लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यापासून शाळा, महाविद्यालय, कार्यालय पूर्णपणे बंद आहेत. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे पगार कपात झाले आहेत. त्यामुळे घर कसं चालवायचं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र अशा अवस्थेत लोकांना दिलासा मिळण्याऐवजी महावितरण कंपनीने चक्क मनमानी अॅव्हरेज वीज बिल देऊन लोकांची झोप उडवली आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या नव्या आणि जुन्या विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल आकरण्यात आले आहे. हे वीज बिल पाहून हितेंद्र ठाकूर यांना जबरदस्त शॉक लागला. या वीज बिलानंतर हितेंद्र ठाकूर यांनी महावितरण केवळ वीज ग्राहकांना लुटण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

“मी स्वत: वीज बिल भरणार नाही, तुम्ही सुद्धा भरु नका?” असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. “मी तुमच्यासोबत उभा आहे,” असे आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा – Electricity Bill | 20 हजार कोटींच्या वसुलीसाठी वीज बिलं वाढवले, किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी त्यांनी केली. (MLA Hitendra Thakur Viva College get 5 lakh electricity bill)

संबंधित बातम्या : 

एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल….

Asha Bhosle | आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, ‘महावितरण’चे उत्तर…

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *