Asha Bhosle | आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, ‘महावितरण’चे उत्तर…

लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली आहे.

Asha Bhosle | आशा भोसलेंना दोन लाखांचे वीज बिल, 'महावितरण'चे उत्तर...
Follow us
| Updated on: Aug 02, 2020 | 11:01 AM

मुंबई : गेल्या तीन-चार महिन्यात वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता प्रख्यात गायिका आशा भोसले यांनीही तक्रार केली आहे. लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याची तक्रार भोसलेंनी केली आहे. (Asha Bhosle flags Rs 2 lakh power bill for June)

आपल्याला जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आल्याची तक्रार आशा भोसले यांनी ‘महावितरण’कडे केल्याचे वृत्त ‘इकोनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. लोणावळ्यात असलेल्या आशा भोसले यांच्या बंगल्याचे हे बिल आहे. मात्र हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा ‘महावितरण’ने केला आहे.

आशा भोसले यांना मे महिन्याचे बिल 8 हजार 855 रुपये, तर एप्रिलचे बिल 8 हजार 996 रुपये इतके आले होते. बिलावरील नोंदीनुसार गेल्या जून महिन्यातही त्यांना 6 हजार 395 रुपये बिल आले होते. त्यामुळे हे वाढीव दोन लाख रुपये कसले, असा सवाल विचारला जात आहे.

हेही वाचा : ‘सर्किट’ला ‘शॉक’! ‘अदानी म्हणजे हायवे लुटारु’, लाखभर वीज बिलामुळे अर्शद वारसीची आगपाखड

“आशा भोसले यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत पुण्यातील वरिष्ठ अधिकारी स्वतः रीडिंग चेक करण्यासाठी बंगल्यात गेले होते. त्यावेळी मीटर योग्य असल्याचे दिसून आले, म्हणजेच बिलही योग्य आहे” असं ‘महाडिस्कॉम’च्या प्रवक्त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.

“योग्य तपासणी केली असता आशा भोसले यांचा बंगला बंद नव्हता आणि तिथे काही चित्रीकरणेही सुरु होती” असेही सांगण्यात आले. आशा भोसले यांची प्रतिक्रिया समजलेली नाही.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

याआधीही काही बॉलिवूड कलाकारांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत. अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलामुळे शॉक बसला. लाखभर रुपयाचे वीज बिल आल्याचे सांगत अर्शदने ट्विटरवर आगपाखड केली होती, मात्र अखेर प्रॉब्लेम सुटल्याचे सांगत अर्शदने ट्वीट डिलीट केले आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे आभारच मानले.

अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही वाढीव वीज बिलाची तक्रार ट्विटरवर केली होती. “3 महिन्यांचा लॉकडाऊन आणि मला आश्चर्य वाटते की गेल्या महिन्यात मी अशी कोणतीही उपकरणे नव्याने वापरली किंवा विकत घेतली की माझ्या विजेच्या बिलात इतकी वेगाने वाढ होईल. अदानी इलेक्ट्रिकल, आपण कोणत्या प्रकारच्या ‘पॉवर’साठी ही किंमत आकारत आहात?” असा सवाल तापसीने विचारला होता.

(Asha Bhosle flags Rs 2 lakh power bill for June)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.