AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास; एकनाथ खडसेंचा भाजपवर थेट आरोप

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला.(Bhosari land scam)

माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास; एकनाथ खडसेंचा भाजपवर थेट आरोप
एकनाथ खडसे
Reporter Sudhakar Kashyap
Reporter Sudhakar Kashyap | Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 11:33 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला. माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. (Eknath Khadse reaches ED office in for questioning in money laundering case)

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.

अजून किती चौकश्या करणार?

ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल त्यांनी केला.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. (Eknath Khadse reaches ED office in for questioning in money laundering case)

संबंधित बातम्या:

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला

(Eknath Khadse reaches ED office in for questioning in money laundering case)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश