AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priti Satam : ‘यात पडू नका, नाहीतर..’ कुर्बानी वादानंतर भाजप नगरसेविका प्रिती साटम यांना धमकी

Priti Satam : बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. मुंबई आणि आसपासच्या भागात या कुर्बानीला काही भाजप आमदारांनी विरोध केला होता. त्यांनी महापालिकेला पत्र लिहून अशी परवागनी देऊ नये अशी मागणी केली होती. आता या प्रकरणात भाजप नगरसेविकाला धमकी मिळाली आहे.

Priti Satam : 'यात पडू नका, नाहीतर..' कुर्बानी वादानंतर भाजप नगरसेविका प्रिती साटम यांना धमकी
priti Satam
| Updated on: May 29, 2026 | 12:59 PM
Share

भाजप नगरसेविका प्रीती साटम धमकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी दिंडोशी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. गोरेगाव गोकुळधाममध्ये उघड्यावर कुर्बानी देण्यावर बंदी घालण्याची मागणी प्रीती साटम यांनी केली होती. त्यानंतर बीएमसीने परवानगी रद्द केली. या निर्णयानंतर त्यांना सोशल मीडिया आणि फोनवरून धमक्या येऊ लागल्या. या धमकीप्रकरणी कारवाई व्हावी, यासाठी प्रीती साटम काही वेळापूर्वीच दिंडोशी पोलीस ठाण्यात आल्या होत्या.”प्रीती साटम यांनी त्यांना विविध माध्यमांतून धमक्या मिळत असल्याची तक्रार केली आहे. धमकीच्या कॉलचा तपशील दिला आहे. पोलीस तपास करून आवश्यक ती कारवाई करतील” दिंडोशी विभागाचे एसीपी विजय भिसे यांनी सांगितलं.

प्रीती साटम यांनी सांगितले की, “खुल्या कुर्बानी प्रकरणात लोकांचा आवाज उठवल्यामुळे त्यांना धमक्या मिळत आहेत. धमकी देणारे म्हणत आहेत की, यात पडू नका, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. मला माझ्या फोनवर आणि सोशल मीडियावर धमक्या येत होत्या. सर्व नंबर आणि तपशील पोलिसांना देण्यात आले असून, पोलिसांनी याचा तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे”

विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला

गोरेगाव भाजपं प्रभाग क्र 52 च्या नगरसेविका प्रिती साटम यांनी गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाईट गार्डन फेज-२ मधील आझाद नगर डी-३ इमारतीच्या आवारात उघड्यावर बकरा कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी सहाय्यक आयुक्त, पी (दक्षिण) विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानीवरुन मुंबई आणि आसपासच्या भागात जोरदार राजकारण रंगलं होतं. मीरा रोडमध्ये बकऱ्याच्या कुर्बानीवरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये जोरदार वादावादी झाली. विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला.

सागर पार्क सोसायटी मध्ये विरोध

घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटी मध्ये बकरा कुर्बानीला जोरदार विरोध झाला. तिथे 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी सुरु होती. पण विरोधानंतर BMC ने अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली. “महापालिकेने आम्हाला दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी. आम्ही तिकडे बोकड कुर्बानी करणार. आम्हाला कुठेही सोसायटीचं नाव खराब करायचं नाही” असं इथे राहणाऱ्या नागरिकांनी सांगितलं.

Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!