मोठी बातमी! सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोंबरपर्यंत स्थगिती, थेट..

सचिन वाझे प्रकरणात कोर्टात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच हायकोर्टाने वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्यास अगोदर नकार दिला. आता मुख्य न्यायमुर्तींसमोर सुनावणी पार पडली. यादरम्यान वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली.

मोठी बातमी! सचिन वाझेच्या जामिनाला 7 ऑक्टोंबरपर्यंत स्थगिती, थेट..
High court sachin vaze
| Updated on: Sep 30, 2026 | 1:45 PM

सचिन वाझे प्रकरणात कोर्टात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच हायकोर्टाने वाझेच्या जामिनाला स्थगिती देण्यास अगोदर नकार दिला. त्यानंतर पुन्हा मुख्य न्यायमुर्तींकडे सुनावणी झाली असता 7 ऑक्टोंबरपर्यंत जामिनाला स्थगिती देण्यात आली. म्हणजेच पुढील काही दिवस वाझेच्या मुक्काम तुरूंगात वाढला आहे. सचिन वाझेच्या जमिनाबाबत मुख्य न्यायाधीशांच्या समोर NIA ने जोरदार विरोध केला. NIA वकिल अनिल सिंग यांनी म्हटले की, सचिन वाझेवर दहशतवाद आणि हत्यांचा आरोप आहे. या प्रकरणात ज्यांच्या घराच्याखाली ही स्फोटकं ठेवली होती, त्या अंबानी कुटुंबातील एक सदस्याचा जबाब नोंदवलेला आहे. सचिन वाझेवर केवळ एक नाही तर अनेक गुन्हे नोंदवले आहेत. मात्र, या सुनावणीदरम्यान सचिन वाझेचे वकील उपस्थित नव्हते.

त्यामुळे वाझेच्या वकिलांचे ऐकण्यासाठी जामीन अर्जाला स्थगिती देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला. सचिन वाझेचा कारागृहात मुक्काम वाढला आहे. वाझेच्या जामिनाला कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत स्थिगिती दिली. कोर्टाने अगोदर वाझेचा जामीन अर्ज काही अटी ठेऊन दिला. तब्बल पाच जिल्ह्यात पूर्णपणे प्रवेशबंदी वाझेला करण्यात आली.

Loading...

सचिन वाझेच्या तुरुंगातून मुक्त होण्याचे आदेश मिळाले होते. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून रिलीज मेमो मिळाला. रिलीज मेमो ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या पेटीत टाकण्यात आला. सकाळी पेटी उघडल्यानंतर हा रिलीज मेमो तुरुंग प्रशासन तपासेल आणि त्यानंतर कारागृहातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सचिन वाझेची सुटका करण्यात येईल.

सचिन वाझे दुपारपर्यंत तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता होती. तत्पूर्वी हायकोर्टाने दिलेल्या निकालानंतर पुन्हा एकदा सचिन वाझेचा मुक्काम वाढला आहे. हायकोर्टाने सत्र न्यायालयाने दिलेला जामीन आदेश रद्द करावा यासाठी एनआयएने याचिका केली होती. पण हायकोर्टाने पहिल्या सुनावणीत जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुख्य न्यायमुर्तींकडे सुनावणी झाली. यादरम्यान वाझेचा गेम फिरला. मागील काही वर्षांपासून वाझे तुरूंगातच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us