सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुंबई-पुण्यादरम्यान ‘या’ ट्रेन रद्द

| Updated on: Jun 28, 2019 | 11:03 PM

हवामान विभागाने 29 आणि 30 तारखेला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे या दरम्यान धावणाऱ्या अनेक इंटरसिटी आणि पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आल्या आहेत.

सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुंबई-पुण्यादरम्यान या ट्रेन रद्द
Follow us on

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दिवसभर रेल्वेची वाहतूक संथ गतीने होती. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही पावसाचा परिणाम झालाय. हवामान विभागाने 29 आणि 30 तारखेला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे या दरम्यान धावणाऱ्या अनेक इंटरसिटी आणि पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची दखल घेऊनच बाहेर पडण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलंय.

रद्द झालेल्या ट्रेन

  • 12126/12125 मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (Mumbai-Pune Pragati Express)
  • 11010/11009 मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस (Mumbai-Pune Sinhagad Express)
  • 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर (Bhusaval-Mumbai Passenger)
  • 51318/51317 पुणे-पनवेल पॅसेंजर (Pune-Panvel Passenger)

वरील ट्रेन 29 आणि 30 तारखेसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

30 आणि 01 तारखेला रद्द

  • 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर (Mumbai-Bhusaval Passenger)

29 आणि 30 तारखेला 11025/11026 ही भुसावळ-पुणे एक्स्प्रेस दौंड मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे मार्गावर ट्रॅकवर अनेकदा दरड कोसळण्याचा धोका असतो. दरड कोसळल्यास संपूर्ण रेल्वे वाहतुकीलाही धोका असतोच, शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर येतो. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय.