कोकण आणि मुंबईत पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा

| Updated on: Jul 25, 2019 | 10:17 PM

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोव्यात पाच दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. इथे 76% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  तर पालघरसह काही ठिकाणी 26 आणि 28 तारखेला अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय.

कोकण आणि मुंबईत पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
Follow us on

पुणे : हवामान विभागाने पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा (IMD prediction) अंदाज व्यक्त केलाय. त्यानुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर मुंबईला 27 आणि 28 तारखेला अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) आहे. मात्र मराठवाड्यात पुढील चार दिवस हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, गोव्यात पाच दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. इथे 76% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  तर पालघरसह काही ठिकाणी 26 आणि 28 तारखेला अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलाय.

मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. 25, 27 आणि 29 तारखेला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 26 आणि 28 तारखेला अतिवृष्टीच इशारा हवामान विभागाने दिलाय.

मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा विस्तृत पाऊस पडेल. मात्र घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे.

मराठवाड्यात गुरुवारपासून पुढील चार दिवस हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात 29 तारखेला पाऊस कमी होईल.

त्याचबरोबर विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भात 27 तारखेला पाऊस पडणार असून दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर 29 आणि 30 जुलैला पाऊस कमी होत जाईल.

पुण्यात 27 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि 28, 29 तारखेला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे.