AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयटीच्या रडावर आलेले राहुल कनाल, संजय कदम आणि बजरंग खरमाटे कोण?; शिवसेनेची कोंडी होणार?

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने तीन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आयकर विभागाने आज पुन्हा एकदा धाडसत्रं सुरू केलं आहे.

आयटीच्या रडावर आलेले राहुल कनाल, संजय कदम आणि बजरंग खरमाटे कोण?; शिवसेनेची कोंडी होणार?
आयटीच्या रडावर आलेले राहुल कनाल, संजय कदम आणि बजरंग खरमाटे कोण?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2022 | 1:43 PM
Share

मुंबई: शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने  (it department) तीन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आयकर विभागाने आज पुन्हा एकदा धाडसत्रं सुरू केलं आहे. आयकर विभागाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राहुल कनाल  (rahul kanal) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम (sanjay kadam) यांच्या घरावर छापेमारी केली आहे. कनाल हे युवा सेनेत पदाधिकारी आहेत. तर संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहेत. तसेच आयकर विभागाने पुण्यात आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरीही छापेमारी केल्याचं वृत्त आहे. सकाळपासूनच आयकर विभागाने ही छापेमारी सुरू केली आहेत. विशेष म्हणजे कनाल आणि कदम ही दोन्ही नावे कधीच चर्चेत नव्हती. या दोघांवरही आयकर विभागाची वक्रदृष्टी फिरल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले असून या कारवायांमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल कनाल कोण आहेत?

राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत. वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

खरमाटेंवर यापूर्वीही आरोप

बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचं समजतं. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते. आज खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापेमारी केल्याचं वृत्त आहे.

संजय कदम हे परब यांचे विश्वासू

संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम राहतात. कदम हे केबल व्यावसायिक आहेत.

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी; आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

कोण आहेत राहुल कनाल, ज्यांच्या घरी आयकर विभागानं धाड टाकलीय? आदित्य ठाकरेंशी कनेक्शन?

कामावर रुजू झाल्यावर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, एसटीचं गोपनीय पत्रं उघड, पडळकर, खोतांकडून पत्राची होळी

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन