आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी; आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी; आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाडImage Credit source: rahul kanal twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 11:26 AM

मुंबई: शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या (shivsena) आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.

राऊतांच्या पीसी आधीच

शिवसेना नेते संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते केंद्रीय यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार आहेत. मात्र, आज आयकर विभागाने शिवसेनेच्या नेत्याच्या घरी छापा मारून शिवसेनेची कोंडी केली असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राऊतांच्या पीसी आधी भाजपचा रेड प्लान होणार असल्याचंही काल बोललं जात होतं. त्यानंतर आज आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

कोण आहेत कनाल?

राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत.

भातखळकर म्हणतात…

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आयकर विभागाच्या या कारवाईचे समर्थन केलं आहे. आयकर विभाग किंवा कोणतीही तपास यंत्रणा धाड मारण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच धाड मारत असते. कनाल यांच्याबद्दल काही माहिती आयकर विभागाला मिळाली असेल म्हणूनच त्यांनी धाड मारली असावी. त्यांनी सहकार्य करायला हवं, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच भातखळकर यांनी सकाळी ट्विट करून अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा बजरंग खरमाटे? असं सूचक ट्विट केलं होतं.

संबंधित बातम्या:

VIDEO: केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचारी, राऊतांच्या रडारवर तपास यंत्रणा; आज कोणता बॉम्ब टाकणार?

Maharashtra News Live Update : राज ठाकरेंचा पुणे दौरा, शहरात मोठमोठे फ्लेक्स

Aurangabad | जिल्हात पुन्हा नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल, नो रेशन, निर्बंध हटवण्यासाठी लसीकरणावर भर, वाचा नवी नियमावली!

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.