
कोकण रेल्वेमुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर वाहतूकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोकण रेल्वे उभारणीसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळातर्फेच कोकण रेल्वेचा कारभार पाहिला जात आहे. 1997 साली महाराष्ट्राची वेस ओलांडून कोकण रेल्वे मँगलोरकडे आली. या 27 वर्षांत कोकणातील चाकरमान्यांसाठी गाड्यांची संख्या वाढलेली नाही. कोकण रेल्वेने सुरुवातीला दादर-रत्नागिरी, कोकणकन्या आणि मांडवी या तीन गाड्या सेवा देत होत्या. परंतू मध्य रेल्वेने या मार्गावर अनेक गाड्या सोडल्यानेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ येथील पर्यटनाला बऱ्याच प्रमाणात चालना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाच्या ‘अमृत भारत’ या योजनेत महाराष्ट्रातील एकाही स्थानकाचा समावेश नसून केवळ मडगाव आणि उडुपी या स्थानकांचा समावेश केलेला आहे. कोकण रेल्वेकडे स्वत:च्या गाड्या आणि इंजिन नाहीत. त्यांना यासाठी मध्य रेल्वेवर विसंबून रहावे लागते. कोकण रेल्वेचा मार्ग केवळ यासाठी वापरला जात आहे. कोकण रेल्वेचा...