CSMT जवळ लोकलचा डबा घसरला, वाहतूक विस्कळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ (CSMT) लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

CSMT जवळ लोकलचा डबा घसरला, वाहतूक विस्कळीत
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 9:02 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ (CSMT) लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पनवेलहून सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा दुपारी ११.३० च्या सुमारास घसरल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनजवळ पनवेल लोकलचा डबा घसरला. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही.

मात्र लोकलचा डबा घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून या मार्गावरील काही लोकल मस्जिदपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या . यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली असून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. वडाळा ते सीएसएमटी स्थानकापर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम झाला.  यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून ऐन उन्हात प्रवाशांना खाली उतरून ट्रॅकवरून चालत प्रवास करावा लागला.

मेन लाईनच्या वाहतुकीवर परिणाम नाही 

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून हा डबा बाजूला काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी आणखी बराच वेळ लागू शकतो. या घटनेचा मेन लाइनवरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेल नाही. मात्र हार्बरवरील प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला

ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या हा डबा ट्रॅकवर वाहतूकक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन व अधिकारी अविरत प्रयत्न करत आहेत. हा डबा नेमका कसा घसरला , त्याचे कारण काय हे नंतर चौकशीतून समोर येईल. आणखी १ ते दीड तासात ही वाहतूर सुरळीत होऊ शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.