केंद्रात सत्ताबदल होणार, पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला
राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार असल्याचाही दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जनतेची सहानुभूती आहे. इतकंच नाहीतर शऱद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा यंदाच्या निवडणुकीत होणार
इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या संवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. यासह राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार असल्याचाही दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जनतेची सहानुभूती आहे. इतकंच नाहीतर शऱद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा यंदाच्या निवडणुकीमध्ये होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. बघा व्हिडीओ पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
Published on: May 14, 2024 05:46 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

