पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
काल १३ मे रोजी राज्यात पार पडलं. ११ जागांवर चौथ्या टप्प्यातील मतदार झालं. यामध्ये मंत्री रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, पकंजा मुंडे आणि अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्केच मतदान पार पडलं.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल १३ मे रोजी राज्यात पार पडलं. ११ जागांवर चौथ्या टप्प्यातील मतदार झालं. यामध्ये मंत्री रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, पकंजा मुंडे आणि अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्केच मतदान पार पडलं. पुण्यात यंदा तिरंगी लढत आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात सामना आहे. पुण्यात ४४. ९० टक्के मतदान झालंय. तर कमी मतदान झाल्याने धाकधूक वाढली आहे. पुण्यानंतर शिरूरची लोकसभा निवडणूक लक्षवेधी आहे. शिरूरमध्ये ४३. ८९ टक्के मतदान झालंय. शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटातून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे आता नेमका विजय कोणाचा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

