Maharashtra Assembly Winter Session 2021 Live : विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी महाविकासआघाडीची बैठक, मुख्यमंत्री व्हिसीद्वारे सहभागी होणार

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live : विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी महाविकासआघाडीची बैठक, मुख्यमंत्री व्हिसीद्वारे सहभागी होणार
Maharashtra Assembly winter session
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 6:00 AM

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live :  राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित असतील. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.