BIG BREAKING | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 4250 कोटींची तरतूद
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय विविध विभागांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सरकार आता नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलणार आहे.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण तोंडावर आलाय. या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दिलासा देणं जास्त जरुरीचं आहे. यावर्षी अनेक भागांमध्ये पाऊस हवा तसा पडलेला नाही. जिथे पडला तिथे इतका पडला की शेतीचं नुकसान झालंय. तरीही शेतकऱ्यांनी पिकं उभी केली आहेत. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणं आता जास्त आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलंय. या योजनेसाठी तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद करण्यात आलीय.
राज्य सरकारने राज्यातील निर्यातीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या धोरणासाठी 4250 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय म्हणजे विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची धोडक्यात माहिती