AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात घामाच्या वासाने हैराण झाले असाल तर ‘या’ 7 घरगुती उपायांचा करा अवलंब

उन्हाळ्यात घाम येणं सर्वात सामान्य आहे. मात्र घामामुळे तीव्र वास येतो. अशातच काही सोप्या उपायांबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत जे या वासापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.

उन्हाळ्यात घामाच्या वासाने हैराण झाले असाल तर 'या' 7 घरगुती उपायांचा करा अवलंब
body sweat smellImage Credit source: Aflo Images/Getty Images
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 5:52 AM
Share

उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढतच असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घाम येणं ही सामान्य आहे. परंतु अनेकांसाठी घामाचा वास ही एक मोठी समस्या बनते. विशेषतः जेव्हा तुम्ही कामावर, कॉलेजमध्ये, प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. अशातच शरीरातील घाम त्वचेवरील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा वास येतो. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम वाढतो, ज्यामुळे ही समस्या आणखी वाढते. या समस्येचा सामना करण्यासाठी बरेच लोकं महागडे डिओडोरंट्स किंवा परफ्यूम वापरतात, परंतु त्यांचे परिणाम बहुतेकदा जास्त वेळ टिकत नाही.

अशावेळेस योग्य सवयी आणि घरगुती उपायांनी या समस्येचे निराकरण करणे महत्वाचे आहे. तुम्हीही घामाचा वास दुर करण्यासाठी उपाय शोधत असाल तर आजच्या लेखात आपण काही घरगूती उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

सैल आणि सुती कपडे घाला

उन्हाळ्यात घट्ट व सिंथेटिक कपडे परिधान केल्याने घाम आणि त्याचा ओलावा दिसू शकतो त्यासोबत दुर्गंधी वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सैल, सुती कपडे घालण्याचा प्रयत्न करा, कारण ते घाम सहजपणे शोषून घेतात. अशा प्रकारे, घाम लवकर सुकतो, ज्यामुळे दुर्गंधीची शक्यता कमी होते.

तुमच्या काखेच्या आणि पायांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

शरीराच्या काही भागांमध्ये, जसे की काखेत, पाय आणि मान या भागांवर जास्त घाम येतो. या भागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. शरीराच्या या भागांची नियमित स्वच्छता केल्याने बॅक्टेरिया आणि वास कमी होण्यास मदत होते.

लिंबाचा करा वापर

लिंबूमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. म्हणून आंघोळीपूर्वी तुमच्या काखेत थोडेसे लिंबू चोळल्याने घामाच्या वासावर नियंत्रण मिळवता येते.

पुरेसे पाणी प्या

डिहायड्रेशनमुळे घामाचा वास तीव्र होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. पाणी शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास मदत करते आणि घामाचा वास कमी करते.

तुरटीचे पाणी वापरा

तुरटीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो जो दुर्गंधी निर्माण करणारे जंतू कमी करतो. आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी विरघळवून आंघोळ केल्याने तुमचे शरीर फ्रेश होते आणि घामाचा वास कमी होतो.

ॲपल सायडर व्हिनेगर वापरा

ॲपल सायडर व्हिनेगर त्वचेचा पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि बॅक्टेरिया कमी करते. आंघोळीच्या आधी कापसाच्या मदतीने काखेत थोड्या प्रमाणात अ‍ॅपल सायडर व्हिनेगर लावा आणि काही मिनिटांनी ते स्वच्छ धुवा. यामुळे घामाचा वास कमी होण्यास मदत होऊ शकते.

डिओडोरंट्स किंवा नैसर्गिक उपाय वापरा

तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर तुम्ही सौम्य डिओडोरंट किंवा नैसर्गिक उपाय वापरू शकता. गुलाबपाणी किंवा तुरटीसारखे घरगुती उपाय देखील घामाचा वास कमी करण्यास मदत करू शकतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना