Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, शनिवारी 126 जणांचा कोविडनं मृत्यू

| Updated on: Aug 29, 2021 | 11:43 AM

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, शनिवारी 126 जणांचा कोविडनं मृत्यू
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

आरोग्य विभागाच्यावतीनं जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार शनिवारी 4 हजार 455 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 62 लाख 59 हजार 906 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.02 वर पोहोचला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्केंवर पोहोचला आहे. सध्या 2 लाख 92 हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 2 हजार 357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

शुक्रवारी महाराष्ट्रात 4 हजार 654 कोरोना रुग्णांची नोदं झाली होती. कोरोना संसर्गामुळं 170 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 3 हजापर 301 लोक कोरोनामुक्त झाले होते.

मुंबईत 388 रुग्णांची नोंद

मुंबई शनिवारी 388 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा कोरोना रुग्ण बरे होण्याच दर 97 टक्केंवर पोहोचला आहे. राजधानीतील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 43 हजार 153 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोना विषाणू संसर्गामुळं 15 हजार 972 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाख 21 हजार 759 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 2974 जणांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत शनिवारी 37 हजार 335 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एकाच सोसायटीत 41 कोरोना रुगण

पिंपरी चिंचवडच्या राहटणी पिंपळे सौदागर मधल्या मिरचंदानी पाल्म्स या एकाच सोसायटी मध्ये मागील 5 ते 6 दिवसात तब्बल 41 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यात काही लहान मुलांचा ही समावेश आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. आता ही सोसायटी सील करण्यात आली असून विविध उपाय योजना आखल्या जात आहेत.

इतर बातम्या:

‘लढणारी कार्यकर्ती गेली’, रामदास आठवले यांनी घेतली गेल ऑम्व्हेट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Maharashtra Corona Update covid cases increased on 28 August in Maharashtra reported by State health Department