Sanjay Raut: दिल्लीश्वरांसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, बाण तयार ठेवा, कुठे घालायचा.. काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लला गेलेत. त्यांचं हायकमांड तिकडे आहे, असे सांगत शिवसेना लाल किल्ल्याला सलाम करीत नाही, तर रायगडाला सलाम करते असे राऊत म्हणाले. शिवसेनेचं हायकमांड मातोश्रीवर असताना दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे कसे, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राने सतत दिल्लीशी संघर्ष केला, हे राज्य, मुंबई मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागल्याची आठवण राऊत यांनी करुन दिली. शिवसेना तोडून मुंबई, महाराष्ट्र तोडण्याचा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: दिल्लीश्वरांसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, बाण तयार ठेवा, कुठे घालायचा.. काय म्हणाले संजय राऊत?
दिल्लीश्वरांवर संजय राऊत यांची टीका
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 2:14 PM

नाशिक – पैशांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं असतं तर चित्र वेगळं असतं. कितीतरी फाटक्या शिवससैनिकांना अनेक धनिकांना हरवलं आहे, मातीला मिळवलं आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपा आणि बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. ज्या पद्धतीने राज्यात सत्तापालट झाल्यानं देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. साऱ्या महाराष्ट्राची सहानभूती शिवसैनिकांसोबत (Shivsena) आहे. साऱ्या देशातून तेलंगणा आणि प. बंगालमधून शिवसैनिकांना पाठिंबा मिळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. पैशाने, सत्तेने काहीही करु शकतो ही भाजपाची घमेंड मोडून काढू असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)दिल्लला गेलेत. त्यांचं हायकमांड तिकडे आहे, असे सांगत शिवसेना लाल किल्ल्याला सलाम करीत नाही, तर रायगडाला सलाम करते असे राऊत म्हणाले. शिवसेनेचं हायकमांड मातोश्रीवर असताना दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री शिवसेनेचे कसे, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राने सतत दिल्लीशी संघर्ष केला, हे राज्य, मुंबई मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागल्याची आठवण राऊत यांनी करुन दिली. शिवसेना तोडून मुंबई, महाराष्ट्र तोडण्याचा डाव असल्याचे संजय राऊत म्हणाले.

बाण तयार ठेवा, कुठे घालायचा..

बेईमान आमदार आणि खासदार आले आणि गेले तरी शिवसैनिक राहणार आहेत. या शिवसैनिकांमुळेच आमदार आणि खासदार होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. धनुष्य-बाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आधी ह्रद्यातला प्राण जाईल मग धनुष्य-बाण जाईल, असे राऊत म्हणाले. धनुष्य-बाण आपल्या हातात ठेवा. जर कुणी खेचायचा प्रयत्न केला तर बाण हातात ठेवा, कुठे घुसवायचाय हे आदेश योग्य वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या नावाचा वाद इनाम आणि बेइमानीचा आहे

आता सोडून गेलेले गद्दार हे शिसेनेचे नाव घेत आहेत. हा वाद इनाम आणि बेईमानीचा आहे, असे संजय राऊत म्हणाले. बंडखोर दररोज नवनवी कारणे देत असल्याचे त्यांनी सांगितले. एकदा त्यांनी एकत्र मिळून का बाहेर पडलात, हे सगळ्यांनी मिळून ठरवा, असा टोलाही त्यांनी लगावला. गेलेले आमदार हे स्वार्थासाठी आणि खोकेबाजीमुळे गेल्याचं त्यांनी सांगितलं. फुटलेल्या लोकांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना संपवण्याचे भाजपाचे प्रयत्न

भाजपाला जेव्हा शिवसेना संपवता आली नाही. तेव्हा शिवसेना फोडण्यासाठी भाजपाने कोट्वधी रुपये ओतल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा वारही भाजपाने केल्याचा आरोप त्यांनी केला. दबाव, झुंडशाहीच्या आधारावर शेवटी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. या ४० आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले आहे.