उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला, एमबीए सीईटीच्या प्रश्नावर चर्चा, तिढा सुटणार?

| Updated on: Oct 20, 2021 | 12:13 PM

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी ही भेट एमएचटी एमबीए सीईटी (MBA CET) परीक्षेसंदर्भात असल्याची माहिती दिली.

उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला, एमबीए सीईटीच्या प्रश्नावर चर्चा, तिढा सुटणार?
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
Follow us on

मुंबई: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी ही भेट एमएचटी एमबीए सीईटी (MBA CET) परीक्षेसंदर्भात असल्याची माहिती दिली. तसेच आज काही महाविद्यालय सुरु झाली नसली तरी येत्या 25 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरु होतील, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या मार्च 2020 पासून बंद असलेली महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीनं आजपासून सुरु होत आहेत.

भेट नेमकी कशासाठी?

महाराष्ट्रातील काही संस्थांचालकांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीत एमबीए सीईटी संदर्भातल्या काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या होत्या त्या त्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या होत्या. त्यासंदर्भात आज मी शरद पवारांना भेटायला आलो होतो. एमबीएला प्रवेश घेत असणाऱ्या एक लाख पाच हजार विद्यार्थ्‍यांचा हा प्रश्न आहे. एमबीए सीईटी परीक्षा एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली त्यातील 35 विद्यार्थी हे हायकोर्टात गेले आहेत, असं उदय सामंत म्हणाले. त्यावेळी या 35 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करू नका,अशा सूचना हायकोर्टाने आम्हाला दिले आहेत. आम्ही हायकोर्टाला विनंती करीत आहोत की या पस्तीस विद्यार्थ्यांमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले तर त्यांचे वर्ष वाया जाईल. शरद पवारांशी या प्रश्नी चर्चा करण्यात आली. आम्ही यासंदर्भात महाधिवक्ता यांचं मत यामध्ये घेणार आहोत, असं सामंत म्हणाले.

टप्प्या टप्प्यानं कॉलेज सुरु करावं

जरी कॉलेजेसला नियोजन करण्यासाठी किंवा कॉलेज सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने कॉलेज सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उदय सामंत म्हणाले.

कॉलेज जर 20 तारखेला सुरू झाले नाहीत तर त्यांच्यावरही कारवाई वगैरे काही करणार नाही. ही जबाबदारी विद्यापीठांवर दिली आहे, विद्यापीठाने सदरची नियमावली अंतिम केली आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की जी नियमावली आखून दिली आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावे. 20 तारखेला आज कॉलेजेस सुरू होत नसतील तर त्यांनी 21, 22 तारखेला कॉलेज सुरू करावेत. मात्र, 25 तारखेच्या आत हे कॉलेज सुरू केले पाहिजेत. काही त्रुटी असतील तर शासन सुद्धा त्याना मदत करेल, असं उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या:

अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो, साताऱ्यातल्या सभेत शशिकांत शिंदे आक्रमक

भावना गवळींना चिकनगुनियाची लागण; ईडीच्या समोर हजर राहणार नाही

Maharashtra Higher and Technical Education Minister Uday Samant meet NCP Chief Sharad Pawar over MBA CET issue