देवेंद्रभाऊ करे तो रास लिला…; ठाकरे गटाने वीज बिलावरून फडणवीसांना केलं टार्गेट…

| Updated on: Nov 28, 2022 | 9:24 PM

सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कसं आहे की, हम करे तो रासलिली और लोग करे तो कॅरेक्टर ढिला असे ते म्हणतात.

देवेंद्रभाऊ करे तो रास लिला...; ठाकरे गटाने वीज बिलावरून फडणवीसांना केलं टार्गेट...
Follow us on

मुंबईः ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप अशा या तिन्हीही गटातून एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जोरदार हल्लाबोल केला जातो आहे. कधी राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपवर ठाकरे गट निशाणा साधतो आहे तर कधी महाविकास आघाडीच्या कारभाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरे गटावर टीका केली जाते. हे चालू असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील वीज बिलावरून आता महाविकास आघाडी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत देवेंद्रभाऊ करे तो रास लिला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला असा जोरदार टोला सुषमा अंधारे यांनी त्यांना लगावला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, आता जरी माझ्याकडे ही आकडेवारी नसली तरी भविष्यात त्याची माहिती घेऊन महाविकास आघाडीच्यावेळी केलेल्या कामाचा मी आलेख मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी असताना आणि कोरोना काळ सुरू असतानाच्या कामावर देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवले आहे.

यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळ होता तेव्हा मध्य प्रदेश सरकारने नागरिकांची वीज बिलं माफ केली होती मात्र महाविकास आघाडीने वीज बिल माफ केलं नाही त्यामुळे त्यांना वीजबिलावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यावर प्रतिक्रियी देताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कसं आहे की, हम करे तो रासलिली और लोग करे तो कॅरेक्टर ढिला असे ते म्हणतात.

त्यामुळे देवेंद्रभाऊ करतात ते मात्र योग्य आणि दुसरे करतात ते कसं आयोग्य हे पटवून देण्यात ते माहीर आहेत. मात्र यथावकाश मी याबाबतील सगळा आलेख मांडायची माझी तयारी आहे असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले. त्यावरून आता ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.