दसऱ्यामुळे मुंबईतील दादरचं मार्केट गजबजलं, फुलांचे दर गगनाला, झेंडू 300 रुपये किलो

| Updated on: Oct 25, 2020 | 9:53 AM

दादर फूल मार्केटमध्ये झेंडूच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. झेंडूच्या फुलांचे दर पाहून मुंबईकर हैराण झाले आहेत.

दसऱ्यामुळे मुंबईतील दादरचं मार्केट गजबजलं, फुलांचे दर गगनाला, झेंडू 300 रुपये किलो
Follow us on

मुंबई : दसरा सणानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड (Marigold Flowers Price Hike) ऊडाली आहे. तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या सणाला देशात अनन्यसाधारण महत्व आहे. विजयादशमीचा सण साजरा करण्यासाठी झेंडूची फुलं, शमीची आपट्याची पाने, तोरण खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पाऊल टाकलं आहे. त्यामुळे दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा भाव वाढलेला पाहायला मिळत आहे. सध्या दादर मार्केटमध्ये झेंडू 150 ते 300 रुपये प्रती किलोने विकला जात आहे (Marigold Flowers Price Hike).

दादर फूल मार्केटमधील फुलांचे आजचे दर

  • झेंडू – 150 ते 300 रुपये प्रती किलो
  • तोरण – 60 ते 100 प्रती माळ
  • भाताच्या लोम्ब्या – 30 ते 50 रुपये
  • आपट्याची पानं – 60 रुपये

दादर फूल मार्केटमध्ये झेंडूच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. झेंडूच्या फुलांचे दर पाहून मुंबईकर हैराण झाले आहेत. पण, सण साजरा करायचाच हा संकल्प घेत ते चढ्या भावाने फुलं खरेदी करत आहेत.

विजयादशमीचा सण झेंडूच्या फुलांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले. तसेच, भिजलेला झेंडूही बाजारात आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे झेंडूचा भाव हा वधारलेला दिसत आहे. फूल आणि तोरणाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली आहे. पावसासोबतच करोनामुळे देखील फूल बाजारावर परिणाम झाल्याचं चित्र आहे.

नाशकातही फुलांचे भाव वाढले

मुंबईप्रमाणेच नाशिकच्या बाजारातही फुलांचे दर वधाररले आहेत. नाशकात बाजारात नागिकांनी फुलं घेण्यासाठी मेठी गर्दी केली. नाशिकच्या बाजारात 600 ते 700 रुपये कॅरेटने फुलांची विक्री हेत आहे.

 

Marigold Flowers Price Hike

संबंधित बातम्या :

पावसामुळे ऐन नवरात्रीत फुलं खराब, विक्री होत नसल्याने फुलं रस्त्यावर फेकण्याची वेळ