मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या रविवार २९ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा...

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी दि.२९ नोव्हेंबर २०२६ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर रेल्वे मार्गाची डागडुजी करण्यासाठी मुख्यमार्गावर सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मार्गावर मेगाब्लॉक
मुख्यमार्ग – सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी १०.५५ वा. ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
सीएसएमटी ,मुंबई स्थानकातून सकाळी १०.४८ वाजल्यापासून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गाच्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. हा ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकापासून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.
घाटकोपरहून सकाळी १०.१९ वा. ते दुपारी ३.५२ वाजपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्यांना विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. या ट्रेन कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखला स्थानकांवरच थांबतील.
ट्रान्सहार्बरमार्गावर ब्लॉक
ट्रान्स हार्बर लाईन – ठाणे आणि वाशी – नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग सकाळी. ११.१० ते ४.१० दरम्यान
ब्लॉकच्या काळात ठाणे आणि वाशी -नेरुळ -पनवेल स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.
ठाण्याहून सकाळी १०.३५ वा. ते दुपारी ४.०७ वाजे दरम्यान वाशी/नेरुल/पनवेलसाठी सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर लोकल रद्द राहतील
पनवेल/नेरुल/वाशीहून सकाळी १०.२५ वा. ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर फेऱ्या रद्द होतील.
सीएसएमटी-गोरेगाव आणि सीएसएमटी-पनवेलच्या हार्बरमार्गाच्या लोकल आणि नेरुळ-बेलापूर -उरण च्या दरम्यान पोर्टलाईन रविवारच्या वेळापत्रकापासून चालवल्या जातील.