AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे-दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक; लोकलसेवा 18 तासांसाठी ठप्प, अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द

मुंबकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून आज ठाणे ते दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान ठाणे ते दिवा मार्गावरील लोकलसेवा तब्बल 18 तासांसाठी बंद राहणार आहे. सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे-दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक; लोकलसेवा 18 तासांसाठी ठप्प, अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द
लोकल ट्रेन
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 11:56 AM
Share

मुंबई : मुंबकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून आज ठाणे ते दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान ठाणे ते दिवा मार्गावरील लोकलसेवा तब्बल 18 तासांसाठी बंद राहणार आहे. सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल सेवा ठप्प राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे, यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी जादा बस

दरम्यान तब्बल अठरा तास मेगाब्लॉक असल्याने प्रवासाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची  गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने स्पेशल बसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम चालू असून, त्यासाठी अठरा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. सोमवारी रात्री दोन नंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू होईल. यादरम्यान प्रवाशांची गैरसोय  टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वे विभागाने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या

दरम्यान या काळात लोकसोबतच काही एक्सप्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड एक्सप्रेस,मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा

Corona: ओमिक्रॉनच्या धसक्यानं चित्र पालटलं, लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली, अजून 1 कोटी 41 लाख लोकांचा पहिला डोस बाकी

Corona effect : मुंबईत बालकांच्या मृत्यूदरात वाढ; जन्मदर घटला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.