VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा

VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा
sandeep deshpande

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. मनसेनेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

गिरीश गायकवाड

| Edited By: भीमराव गवळी

Dec 19, 2021 | 11:30 AM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. मनसेनेही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट कानडीतूनच कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, (मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमना कदापिही सहन करणार नाही) असा इशाराच सदीप देशपांडे यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा इशारा दिला. निम्म वडागीन राजकारणं द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असा इशाराच देशपांडे यांनी कानडीतून दिला आहे. म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावं. कर्नाटकमध्ये दोन पक्षाचं जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्या अंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा, असा याचा अर्थ होतो. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.

बोटचेपी भूमिका घेऊ नका

दरम्यान, पुतळा विटंबनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका. गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात , देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक; दरी मिटणार?

Gulabrao Patil: मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले, विरोधकांनी येऊन पाहावं, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना डिवचलं

नांदेड : 132 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा पुढाकार, अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें