नांदेड : 132 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा पुढाकार, अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात

नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटण्याचा मार्गावर आहे. पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. इसापूर धरणातून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील संबंधित गावांना आता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

नांदेड : 132 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार; मंत्री गुलाबराव पाटलांचा पुढाकार, अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात
गुलाबराव पाटील
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 19, 2021 | 10:47 AM

नांदेड : जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटण्याचा मार्गावर आहे. पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. इसापूर धरणातून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील संबंधित गावांना आता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जीवन प्राधिकरण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

आ. माधवराव पाटलांच्या पाठपुराव्याला यश

इसापूर धरणातून हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील 132 गावांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असा आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जीवन प्राधिकरण विभागाला दिला आहे. संबंधित 132 गावांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात  पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदार माधवराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. अखेर माधवराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. इसापूर धरणातून टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात

दरम्यान या  पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी जीवन प्राधिकरणासोबत एक बैठक आयोजित करून, योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार माधवराव पाटील  यांना केल्या आहेत. पाणी पुरवठा मंत्र्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई तातडीने केली जाणार असल्याची माहिती आमदार माधवराव पाटील यांनी दिली. दरम्यान पाणी प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या 

परिवहन अधिकाऱ्याकडे 50 हजारांच्या खंडणीचा तगादा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, मोदी साहेबांनाही धोका होऊ शकतो: दीपक केसरकर

Wardha | बाप बाप असतो! ‘पिल्लू’ दुर्धर आजाराने गंभीर, डॉक्टरांची कसोटी, बापाचा ‘रुद्र’ अवतार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें