AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : कोण उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी? AB डिव्हिलियर्सने केली सर्वात मोठी भविष्यवाणी

IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने या सामन्यात कोण फेव्हरेट असेल यावर भाष्य केले आहे.

T20 World Cup : कोण उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी? AB डिव्हिलियर्सने केली सर्वात मोठी भविष्यवाणी
IND vs NZ AbdImage Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2026 | 4:43 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. रविवार 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याविषयी क्रिकेट जगतात चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने या ऐतिहासिक सामन्यावर आपले मत व्यक्त केले आहे. डिव्हिलियर्सने भारत हा ऐतिहासिक सामना जिंकण्यासाठी फेव्हरेट असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोण ठरणार सरस?

एबी डिव्हिलियर्सने म्हटले की, ‘सध्याच्या फॉर्म आणि घरची परिस्थिती पाहता, टीम इंडियाकडे विश्वविजेते बनण्याची सुवर्णसंधी आहे. न्यूझीलंडबद्दल बोलताना तो म्हणाला की, टभारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध जिंकण्याची शक्यता खूपच कमी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, न्यूझीलंडकडे जिंकण्याची शक्यता फक्त 10 ते 20 टक्के आहे. भारताला हरवण्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट खेळावे लागेल.’ पुढे बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, ‘जर भारताने हा सामना गमावला तर तो एक मोठा उलटफेर असेल. डेल स्टेननेही म्हटले की, टमला न्यूझीलंडबद्दल सहानुभूती आहे, मात्र माझे मन भारताला विजेता म्हणून पाहते.’

बुमराह सर्वात मोठे शस्त्र

एबी डिव्हिलियर्सने जसप्रीत बुमराहला भारतीय संघाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणून उल्लेख केला. त्याने बुमराहच्या गोलंदाजीची आणि दबाव सहन करण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. तो म्हणाला की, ‘बुमराहला सामन्याच्या प्रत्येक क्षणाची चांगली समज आहे. त्याला माहित आहे की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संघाला काय आवश्यक आहे आणि तो त्याचे कौशल्य पूर्णपणे अचूकतेने वापरतो. बुमराहचा आत्मविश्वास आणि यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता ही भारतासाठी जमेची बाब आहे.’

न्यूझीलंडला जिंकण्यासाठी चमत्कार करावा लागणार

एबी डिव्हिलियर्सने पुढे बोलताना म्हटले की, ‘मी टीम इंडियाच्या मागे पूर्णपणे आहे. माझे मन आणि हृदय, सर्वकाही भारताच्या विजयाकडे लक्ष वेधत आहे.’ मात्र त्यांनी न्यूझीलंडचे वर्णन एक धोरणात्मकदृष्ट्या हुशार संघ म्हणून केले. तो म्हणाला की, ‘न्यूझीलंड हा परिस्थितीनुसार आपल्या योजना जुळवून घेण्यात पारंगत आहे. मात्र अंतिम सामन्यात भारताची ताकद इतकी मोठी आहे की न्यूझीलंडला जिंकण्यासाठी चमत्कार करावा लागेल.’

Follow Us
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय