संजय राऊत यांच्या जामिनानंतर शिंदे गट घाबरला? उदय सामंत म्हणतात….

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत यांच्या जामिनानंतर शिंदे गट घाबरला? उदय सामंत म्हणतात....
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 3:57 PM

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मिळालाय. त्यांना जामीन मिळाल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी खरंतर हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. राऊतांच्या जामीन अर्जावर शिवसेनेच्या शिंदे गटाची नेमकी काय भूमिका ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी राऊतांना जामीन मिळाल्याने आमच्या अडचणी वाढतील असं कुणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही, असं सामंत म्हणाले. तसेच कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला.

“एखाद्या न्यायालयात केस चालू असताना जामीन मिळाला असेल किंवा जामीन मिळाला नसेल तर त्यावर न्यायालयाच्या बाहेरच्या लोकांनी बोलणं योग्य आहे, असं मला वाटत नाही. न्यायालय हे दोन्ही बाजू ऐकून निर्णय देत असतं. संजय राऊत यांच्याशी संबंधित कोर्टाने दिलेल्या निकालाविषयी मला माहितीदेखील नाही”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

“न्यायालयाच्या बाहेर राहून एखाद्या निकालावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. याशिवाय मी कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे या विषयावर बोलणं योग्य नाही”, असं मत त्यांनी मांडलं.

“कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय? शेवटी आम्हीपण काम करतोय. आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कोण जामीनावर सुटलं, कोण जामीनावर सुटलं नाही हा न्यायालयाचा भाग आहे. कुणी सुटल्यामुळे जर आम्ही अडचणीत येऊ असं कुणाला वाटत असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

“एक लक्षात घ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुणाच्या पत्रकार परिषदेमुळे, कुणाच्या बदनामीमुळे जनतेच्या हृदयातून बाजूला होतील, असं कुणाला समजण्याचं कारण नाही”, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटाचे कान टोचले.

“शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष चालवण्याचा अधिकार आहे. पण या तीन महिन्यात एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात न झालेले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ते कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ते नावारुपाला आले आहेत”, असं उदय सामंत म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.