नरेंद्र मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा… मी इथे सांभाळून घेतो
लोकसभा निवडणूकांचा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मतदार संघात लोकसभेची चुरस पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा असून आज बुधवारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा घेतायत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बुधवारी 15 मे रोजी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा होत आहे. लोकसभा निवडणूकांचा मुंबई आणि ठाणे या दोन्ही शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मतदार संघात लोकसभेची चुरस पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सभा असून आज बुधवारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण पश्चिमेत जाहीर सभा घेतायत. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे नरेश म्हस्के, कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर जाहीर सभा घेत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली. यावेळी मोदी म्हणाले, ‘मुंबईतील एका कार्यक्रमात वेळेत हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मधूनच जावं लागत आहे.’ पुढे ते असेही म्हणाले की, मी शिंदेंना विनंती करतो, तुम्ही जा… मी इथे सांभाळून घेतो…यानंतर जनतेतून मोदींच्या नावानं एकच घोषणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

