AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhavesh Bhinde Arrested : कसा फरार झाला भावेश भिंडे ? ड्रायव्हरला सीमकार्डसाठी पाठवलं अन्… असा आहे घटनाक्रम

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला उदयपूरमधून अटक करण्यात आली. ही दुर्घटना झाल्यापासूनच तो फरार होता आणि पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर तीन दिवसांच्या अथक तपासानंतर गुरूवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या.

Bhavesh Bhinde Arrested : कसा फरार झाला भावेश भिंडे ? ड्रायव्हरला सीमकार्डसाठी पाठवलं अन्... असा आहे घटनाक्रम
| Updated on: May 17, 2024 | 9:44 AM
Share

मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवार, १३ मे रोजी भलमोठ्ठं होर्डिंग पेट्रोलपंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या पोलिसांनी ठेचल्या असून काल त्याला उदयपूरमधून अटक करण्यात आली. ही दुर्घटना झाल्यापासूनच तो फरार होता आणि पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर तीन दिवसांच्या अथक तपासानंतर काल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक करून आज पहाटे मुंबईत आणण्यात आले. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई आता करण्यात येणार आहे.

भावेश भिंडे कसा फरार झाला ?

16 निष्पाप नागरिक आणि शेकडो लोकं जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंग दुर्घटनेबद्दल कळताच भावेश भिंडेने मुंबईतून पळ काढला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि समजामाध्यमे, टीव्ही चॅनेल्सवरून ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. या दुर्घटनेची माहिती कळताच भावेश भिंडे हा त्याच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला.

सीमकार्ड आणण्याच्या बहाण्याने ड्रायव्हरला बाहेर पाठवलं अन्…

मुंबईबाहेर पडल्यानंतर भावेश भिंडे हा लोणावळ्यात गेला आणि तेथील एका खासगी बंगल्यात तो काही थांबला होता. तो लोणावळ्यात लपल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागताच पथकाने तेथेही शोध घेतला मात्र तोपर्यंत भावेश हा तेथून निसटला होता.

पोलिस मागावर आहेत याची कुणकुण भावेशला लागलीच होती, त्यामुळे त्याने ड्रायव्हरला नवीन सीमकार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवलं. आणि अवघ्या तासाभरातच भिंडे हा तिथून एकटाच निघून गेला फरार झाला. त्यानंतर त्याने मजल दरमजल करत अहमदाबाद गाठलं आणि तेथे तो काही काळासाठी एका नातेवाईकाकडे थांबला. नंतर तो तिथून राजस्थानच्या उदयपूर येथे गेला. तेथे गेल्यावर भावेश याने त्याच्या भाच्याच्या नावाने एक रूम बूक केली आणि तो तेथेच लपून बसला होता.

एकीकडे भिंडे फरार असताना मुंबई पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. गुन्हे शाखेची 6 ते 7 पथकं राजस्थान, जयपूर, अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती. तो उदयपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उदयपूरमधील हॉटेलमधून त्याच्या मुसक्या आवळत अटक केली. आज पहाटे त्याला कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले.

भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तर या घटनेसाठी दोषी असलेल्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भावेश भिंडे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला होता.

यापूर्वीही भिंडेवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी महिन्यात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र देखील दाखल झालंय. भावेश भिंडे 2009 मध्ये मुलुंड येथून आमदारकीला उभा राहीला होता. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर 23 गुन्हे दाखल झाल्याची माहीती दिली होती. भावेश भिंडे याच्यावर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचा चेक बाऊन्सिंग झाल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच होर्डींग्ज बसविताना पालिका आणि रेल्वेचे नियम पायदळी तुडविल्याचे अनेक गुन्हे भिंडे याच्यावर दाखल झालेले आहेत. तसेच झाडांना विष घालून मारल्याचा गुन्हा देखील मुंबई महानगर पालिकेने त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.