Raj Thackeray | आधार-राशन कार्ड देणारी माणसं आपलीच; कारवाई कोण करणार?, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी बांग्लादेशी नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना थेट सवाल उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “ह्या सगळ्या गोष्टींचा विचका झालेला आहे. आपल्याकडे कुंपणं शेत खात आहेत. ह्या सगळ्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड देणारी माणसं ही इथलीच आहेत. मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार?”
मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी बांग्लादेशी नागरिकांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना थेट सवाल उपस्थित केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “ह्या सगळ्या गोष्टींचा विचका झालेला आहे. आपल्याकडे कुंपणं शेत खात आहेत. ह्या सगळ्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड देणारी माणसं ही इथलीच आहेत. मग त्यांच्यावर कारवाई कोण करणार?” ठाकरे यांनी जोर देत म्हटले की, “बांग्लादेशींच्या प्रूफसाठी सर्व कागदपत्रे आणि नोंदी देणारी माणसं आपलीच आहेत. तरीही त्यांच्या विरोधात कारवाई का होत नाही?” राज ठाकरे यांनी यावेळी केंद्र आणि राज्य प्रशासनाच्या पद्धतींवर प्रश्न उपस्थित करून, संबंधित संस्थांकडून तत्काळ कारवाई होण्याची मागणी केली आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...

