AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात पूर्वजांचे फोटो लावताना हे नियम पाळाच, अन्यथा निर्माण होईल पितृदोष

आपले जे पूर्वज आहेत, त्यांचा फोटो कुठे लावावा? कुठे लावू नये? फोटो लावताना काय चुका करू नये? याचे नियम देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. आज आपण त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर घरात वास्तुदोषासोबतच पितृदोष देखील निर्माण होऊ शकतो.

Vastu Shastra : घरात पूर्वजांचे फोटो लावताना हे नियम पाळाच, अन्यथा निर्माण होईल पितृदोष
Pitra doshImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 9:05 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात असलेल्या विविध वस्तू कुठे ठेवाव्यात? त्यांची योग्य दिशा कोणती? इथपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे फोटो घरात लावण्याची प्रथा आहे. मात्र पूर्वजांचे फोटो आपण जेव्हा घरात लावतो, तेव्हा काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. पितरांचे फोटो घरात लावताना योग्य नियमांचं पालन केलं गेलं नाही तर घरात पितृदोष निर्माण होतो. जर घरात पितृदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील पूर्वजांचे फोटो हे कधीही देवघरात ठेवू नयेत, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसेच पूर्वजांचे फोटो घरात ठेवताना काय काळजी घ्यावी? कोणते नियम पाळावेत याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्यातील काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

या जागेंवर लावू नका फोटो – वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचा फोटो हा कधीही स्टोअर रूमध्ये जिन्याच्या खाली लावू नका, त्यामुळे घरात वास्तुदोष आणि पितृदोष तयार होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचा फोटो हा कधीही बह्मस्थानी लावू नये, आपल्या घराचा जो मध्यभाग असतो, त्याला ब्रह्मस्थान असं म्हणतात ही जागा नेहमी मोकळी ठेवावी या जागेवर कोणत्याही वस्तू, पसारा किंवा पित्रांचा फोटो लावू नये, त्यामुळे अनेक अडचणी येतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर अनेक जण आपल्या देवघरामध्ये देखील पूर्वजांचे फोटो ठेवतात, मात्र वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. पूर्वजांचा फोटो हा नेहमी घराच्या दक्षिण दिशेवरील भितींलाच लावावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...