कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली मोठी घोषणा, म्हणाले, आज पासून…
राज्यात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असली तरी बाजारात दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते. अखेर अनेक शेतकऱ्यांनी कांदे पिक फेकून देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून थेट कांदा खरेदी केली जाणार असल्याची घोषणा केली. इतकेच नाही तर किती रुपयांनी घेणार हे देखील सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कांदा उत्पादकांच्या समस्येबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांदा फेकून सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Published on: May 15, 2026 03:13 PM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...