राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेखच नाही, चक्क…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी पाठवली होती. या यादीत सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नाव नमूद करण्यात आले आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मात्र पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे प्रमुख पदांमध्ये नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, मात्र सुनिल तटकरे यांच्या नावासमोर हे पद नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षात त्यांना जाणीवपूर्वक साईडलाईन केले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Published on: May 15, 2026 05:30 PM
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...