AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayakwadi Dam | मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ इतका पाणीसाठा शिल्लक

Jayakwadi Dam | मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ इतका पाणीसाठा शिल्लक

| Updated on: May 15, 2026 | 2:33 PM
Share

मराठवाड्यातील पाणी परिस्थिती पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या धरणात केवळ 41 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असून, वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता धरणातील पाणीसाठ्यावरही होताना दिसत आहे.

मराठवाड्यातील पाणी परिस्थिती पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या धरणात केवळ 41 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असून, वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात वाढलेल्या तापमानाचा परिणाम आता धरणातील पाणीसाठ्यावरही होताना दिसत आहे. तीव्र उकाड्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात आणखी घट होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील काही भागांमध्ये आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी भीती प्रशासन आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. त्यामुळे पाणीसाठ्यात होत असलेली घट लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

 

Published on: May 15, 2026 02:33 PM
Follow Us